Home » रुपाली चाकणकर यांनी दिला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा…!
News

रुपाली चाकणकर यांनी दिला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा…!

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेकदा पक्षांतर व राजकीय समीकरणे  बदलण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलल्याचे चित्र यामुळे उभे राहिले आहे व एकंदरीत कोणतेही भाकित वर्तवणे सर्वसामान्य जनतेच्या हातात राहिले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे सध्या राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद आहे त्यामुळे त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे व यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपला अधिकृत राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात अजून काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक अभ्यासू व धडाडीच्या कार्यकर्रत्या म्हणून ओळखल्या जातात.2019 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून बीजेपी मध्ये प्रवेश केला होता व यानंतर रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली होती.

आपल्या कार्यकाळात त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले.रूपाली चाकणकर यांनी यापूर्वी आपल्याला पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय उत्तम रीतीने हाताळल्या आहेत.महिला प्रदेशाध्यक्ष होण्याअगोदर त्यांनी पुण्याच्या महिला अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिले होते व या काळामध्ये त्यांनी महिलांचे संघटन या विषयावर अधिक भर दिला होता.