Home » ‘तारक मेहता’ हे पात्र साकारणा-या शैलेश लोढा यांनी सोडला शो, एका भागासाठी घेत होते चक्क इतके मानधन, वाचून बसेल धक्का…!
News

‘तारक मेहता’ हे पात्र साकारणा-या शैलेश लोढा यांनी सोडला शो, एका भागासाठी घेत होते चक्क इतके मानधन, वाचून बसेल धक्का…!

तारक मेहता का उल्टा चश्मा हा कार्यक्रम गेली 14 वर्षे सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे‌.या कार्यक्रमाने केवळ विनोदच नव्हे तर सामाजिक भाष्य ही केले आहे म्हणूनच हा कार्यक्रम टीआरपी मध्ये गेली अनेक वर्षे अव्वल क्रमांकावर आहे. या कार्यक्रमातील सर्वच पात्र अतिशय लोकप्रिय ठरली आहे. या कलाकारांना प्रत्यक्ष आयुष्यातही यामुळे खूप मानसन्मान मिळाला आहे.

जेठालाल दयाबेन यांच्याप्रमाणेच जेठालालचे फायर ब्रिगेड म्हणून ओळखले जाणारे तारक मेहता चे पात्र सुद्धा खूपच लोकप्रिय आहे. तारक मेहता हे पात्र शैलेश लोढा या कलाकाराने साकारले आहे. शैलेश लोढा हे केवळ एक अभिनेता नव्हे तर उत्कृष्ट कवी आहेत. शैलेश लोढा यांनी नुकताच तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाला अलविदा केले आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमांमधून एक्झिट घेऊन आता नवीन प्रकल्पात शैलेश लोढा काम करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती या कार्यक्रमाचे निर्माते व शैलेश लोढा यांच्याकडून आलेली नाही. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रसिद्धी सोबतच मानधन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिले जात होते.

शैलेश लोढा यांना या कार्यक्रमांमध्ये किती मानधन मिळत होते हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडतो तर शैलेश लोढा हे या कार्यक्रमांमध्ये एका भागासाठी एक लाख रुपये इतके मानधन घेत असत. शैलेश लोढा यांनी हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्यांच्या जागी आता कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागते व त्या अभिनेत्याला प्रेक्षक स्वीकारतील का हे येणारा काळच सांगेल.