Home » ‘या’ कारणामुळे शरद पवार यांनी मंदिरात प्रवेश न करता लांबूनच घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन…!
News

‘या’ कारणामुळे शरद पवार यांनी मंदिरात प्रवेश न करता लांबूनच घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन…!

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नास्तिक असून ते मंदिरात जात नाही अशी टीका केली होती. यावरून खूप सारा वाद झाला होता. आज शरद पवार दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरामध्ये गेले परंतु तिथे त्यांचं स्वागत करण्यात आले परंतु त्यांनीएक खास कारणामुळे मंदिरात प्रवेश केला नाही. चला तर मंग जाणून घेऊया यामागील कारण… 

शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाड्याची पाहणी केली त्यानंतर ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रवेशद्वाराजवळ आले मात्र शरद पवार मंदिरात न जाताच बाहेरूनच दर्शन घेऊन परतले तर यामागील खुलासा राष्ट्रवादीच्याच केला आहे. 

शरद पवार यांनी मंदिरात जाणं टाळलं कारण शरद पवार यांनी मांसाहारी जेवण केलं त्यामुळे चुकीचा पायंडा पडायला नको असे त्यांनी सांगितले त्यामुळे ते मंदिरात गेले नाही असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.