Home » दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा या पदार्थांचे सेवन आणि कमाल बघा
News

दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा या पदार्थांचे सेवन आणि कमाल बघा

घरातील निरनिराळी कामे करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपानुसार त्याच्या ऊर्जेची आवश्यकता सुद्धा भिन्न असते.थकवा आला तर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरांमध्येही प्रभावीपणे कार्यरत राहू शकत नाही. म्हणूनच शरीरातील ऊर्जा टिकून ठेवणे खूपच आवश्यक असते. शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम आणि सोबतच आहार सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरतो. आपल्या आहाराचे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशा तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण प्रामुख्याने केले जाते. यांपैकी सकाळचा नाष्टा हा मोठी भूमिका बजावतो.सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय खातो यावर आपल्या दिवसभरामध्ये शरीरातील ऊर्जेचे प्रमाण अवलंबून असते.सकाळचा नाश्ता मध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करणारे व टिकवून ठेवणारे पदार्थ सेवन केले तर आपल्याला दिवसभरात थकवा जाणवत नाही व आपली कामे सुद्धा अधिक झपाट्याने आपण पूर्ण करू शकतो. आज आपण अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे सेवन केले असता दिवसभरामध्ये शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवता येते.

ऊर्जा’दायी परिपूर्ण नाश्ता म्हणजे असा नाष्टा ज्या मध्ये कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचा समतोल साधलेला असेल. सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते त्यामुळेच अन्य जेवण पेक्षाही नाष्टा हा भरपेट व योग्य प्रमाणात केला पाहिजे.

 जर आपल्याला सकाळी उठताना थकवा व आळस जाणवत असेल तर आपल्या शरीरामध्ये उर्जेची कमतरता निर्माण झाली आहे असे समजावे. शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी व थकवा दूर करण्यासाठी सकाळी नाष्टा मध्ये अंड्याचा समावेश करावा. अंडी हा एक उत्तम एनर्जी बुस्टर  आहे.अंड्यामधील पिवळ्या रंगाचा बलक हा प्रथिने युक्त असतो त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा होतो.

दही -दही हे शरीराला चांगल्या बॅक्टेरिया यांचा पुरवठा करणारा उत्तम पदार्थ आह.दहया मध्ये प्रोटीन, प्रोबायोटिक आणि कॅल्शियम ची मात्रा भरपूर प्रमाणात असते .यामुळे आपल्या पोटाशी निगडीत विकार दूर राखले जातात व पचनास सहाय्य केले जाते. बद्धकोष्ठते पासून आराम मिळतो. आपले पोट साफ झाले असता दिवसभरामध्ये अपचनासारख्या सारख्या समस्या निर्माण होत नाहीत. नाश्त्यामध्ये पराठ्यासोबत दही खाल्ले जाऊ शकते किंवा नुसते दही वापरले जाऊ शकते.दह्यामध्ये आरोग्यासाठी चांगले घटक असतात. त्यामुळे दररोज दह्याचे सेवन केले असता सडपातळ राहण्यास व वजन कमी करण्यासही मदत होते‌.

पीनट बटर- पीनट बटरमध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात.यामुळे शरीराला दिवसभरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा साठवून ठेवण्यास साहाय्य मिळते‌.वाढत्या वयातील मुले आणि शाळेत जाणारी मुले यांना खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ब्रेड सोबत किंवा पराठ्यासोबत पीनट बटर चा वापर अवश्य करावा.

शहाळ्याचे पाणी- शहाळयाचे पाणी पिल्यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा खूप त्वरित प्राप्त होते त्यामुळे जर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर नारळाचे पाणी नियमितपणे सेवन करावे. नारळाच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीराला दिवसभरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा तर मिळतेच मात्र हा ऊर्जेचा एक नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून ही बचाव होतो.नारळ पाण्यामध्ये ऑंटी बॅक्टेरियल आणि ऑंटी व्हायरल गुणधर्म असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.

ओटस-ओटस हा  सध्या खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा हेल्दी नाश्ता मानला जातो. ओटस मध्ये मोठ्या प्रमाणात फोलेट, पोटेशियम आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.ओटससोबत दूध ,फळे किंवा सुक्यामेव्याच्या सोबत खाऊन या अन्नपदार्थांचे चांगले गुणधर्म ही शरीराला पुरवता येतात.

रवा- शरीराला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा देणारा एक सहजपणे उपलब्ध होणारा पदार्थ रवा आहे .याचे सेवन केले असता भूक ही भागते व रव्याचे निरनिराळ्या भाज्या सोबत सेवन केले असता शरीराला अन्य पोषक घटक मिळतात.

सुकामेवा- सुकामेवा मध्ये सुद्धा पोषण व भरपूर प्रमाणात ऊर्जा असते. दह्यामध्ये सुकामेव्याचे सेवन केले असता शरीराला खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात. व शरीराची ऊर्जेची गरजसुद्धा भागवली जाते. काही वेळा आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी कॉफी किंवा चहा सारख्या यांचे सेवन करण्याची सवय असते त्यावेळी दुधाऐवजी सोयामिल्क चा वापर केला असता देखील तातडीने ऊर्जा मिळते व ती टिकवली जाते.

फळे-फळांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी निश्चितच स्वास्थ्य कारक असते. साइट्रस युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे दिवसभरासाठी ची उर्जा शरीराला मिळते.दिवसभरामध्ये कधीही फळांचे सेवन केले तरीही चालू शकते मात्र सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण फळांचे सेवन केले असता त्याचा जास्त फायदा होतो. विशेषतः केळी ,टरबूज, पपई या फळांचे सेवन सकाळच्या नाश्त्यामध्ये करावे.