Home » कौतुकास्पद! जुन्या रुढी, परंपरांना छेद देत कोरोनामध्ये भाऊ गमावल्यानंतर वहिनीचा पुनर्विवाह करुन निर्माण केला एक आदर्श…!
News

कौतुकास्पद! जुन्या रुढी, परंपरांना छेद देत कोरोनामध्ये भाऊ गमावल्यानंतर वहिनीचा पुनर्विवाह करुन निर्माण केला एक आदर्श…!

कोरोनाच्या महामारी मध्ये अनेकांना आपल्या जवळच्या रक्ताच्या मायेच्या माणसांना गमवावे लागले. अनेक घरांमध्ये कर्ते माणूस गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब पोरके झाले. कोरोनाने माणसाला नात्यांचे महत्त्व शिकवले व व्यापक दृष्टिकोन दिला अशी काही उदाहरणे समोर आली आहे.

असेच एक उदाहरण म्हणजे कोरोनामचळे स्वतः घ्या सख्ख्या भावाला गमावल्यानंतर आपली वहिनी व पाच वर्षाच्या पुतणीच्या भवितव्याचा विचार करून वहिनीचा पुनर्विवाह करुन देण्याची जळगाव जिल्ह्यातील घटना होय.कोरोनामध्ये नितीन पाटील यांच्या भावाचे निधन झाले.

भावाच्या निधनानंतर वहिनी सुमित्रा व पाच वर्षाची पुतणी यांची जबाबदारी कुटुंबियांनी स्विकारली असूनही आपल्या वहिनीला तिचे उर्वरित आयुष्य पुन्हा नव्याने जोडीदारासह सुरू करण्याचा अधिकार आहे असे त्यांना मनोमन वाटत होते म्हणून वहिनीच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी नातेवाइक व वहिनीची समजुत काढली. सुमित्रा यांचे प्रमाणे कनाशी  येथील रहिवासी असलेल्या हृषिकेश यांनी आपल्या पत्नी अनघा यांना कोरोनामध्ये गमावले होते.

हृषिकेश यांनी होकार दिल्यानंतर सुमित्रा व हृषिकेश यांचा विवाह नुकताच नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हृषिकेश यांना एक बावीस वर्षांचा मुलगा असून त्यांनी सुमित्रा यांच्या पाच वर्षांच्या मुलीचाही स्वीकार केला आहे. ही घटना म्हणजे कोरोनाच्या संकटानंतर सावरण्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे.