Home » १२५ वर्षीय पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुषी आणि निरोगी असण्यामागचं ‘हे’ आहे रहस्य…!
News

१२५ वर्षीय पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुषी आणि निरोगी असण्यामागचं ‘हे’ आहे रहस्य…!

वाराणसी येथील १२५ वर्षीय पंडित शिवानंद यांना निरोगी आयुष्य आणि योग यांना प्रोत्साहन देण्याच्या कार्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये आलेल्या पंडित शिवानंद यांच्याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.विशेषतः त्यांच्या दीर्घ आयुष्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा आहे.काही वर्षांपूर्वी पंडित शिवानंद यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या दीर्घायुष्याशी संबंधित काही रहस्य सांगितले होते.

पंडित शिवानंद यांच्या मते शारीरिक संबंध आणि मसाल्यापासून दूर राहणे हे आपल्या दीर्घायुष्याचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले होते.पंडित शिवानंद यांनी सुरुवातीपासूनच शारीरिक संबंध आणि मसाल्यां पासून दूर राहणेच पसंत केले आहे व ते तासनतास योगा करतात.पंडित शिवानंद यांच्या पासपोर्टवर त्यांच्या जन्मतारखेचा उल्लेख  8 ऑगस्ट 1896 असा आहे व त्यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे म्हणजे ते तब्बल 126 वर्षांचे आहेत.

शिवानंद यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला व त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय जीवनपद्धती व योग यांना समर्पित केले आहे.पंडित शिवानंद अतिशय साधे भोजन सेवन करतात.त्यांच्या जेवणामध्ये मुख्यतः मसाला व मीठ नसलेल्या उकडलेल्या भाज्यांचा समावेश असतो.भात भाज्या व मिरची हे मुख्य अन्न ते सेवन‌ करतात.ते आपल्या आहारामध्ये दूध आणि फळांचा ही समाविष्ट करत नाही कारण त्यांच्या मते हे सर्व फॅन्सी फूड आहे व त्यांनी कधीही लहानपणी त्यांनी या पदार्थांचे सेवन केले नाही. लहानपणी गरिबीमुळे त्यांना अनेकदा उपाशी राहावे लागले आहे.

त्यांच्या दीर्घायुष्य बद्दल असे म्हटले आहे की मी कधीही सर्वात जास्त वयाचा मनुष्य असल्याचा प्रचार केला नाही मात्र माझ्या अनुयायांना असे वाटते की मी असा प्रचार करावा.वयाच्या सहाव्या वर्षी पंडित शिवानंद यांच्या आई वडिलांचे निधन झाले त्यानंतर शिवानंद‌ यांच्या नातेवाईकांनी त्यांना एका आध्यात्मिक गुरुकडे सोपवले व या गुरूच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अध्ययन सुरू केले.या गुरुंसोबत यांनी अनेक ठिकाणी प्रवास केले.ब्रिटिश काळामध्ये जन्मलेल्या पंडित शिवानंद यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे रुचत नाही.त्यांच्या मते पूर्वीच्या काळी मनुष्य हा संतुष्ट होता कारण त्यावेळी मनुष्याच्या कमी गरजा होत्या.आधुनिक काळात जशा‌ गरजा वाढत आहेत मनुष्य असंतुष्ट होत आहे.समाधानी राहणे हेच खूप गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.