Home » विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयात भिषण आग;१३ जणांचा होरपळून मृत्यू
News

विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयात भिषण आग;१३ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई जवळ असलेल्या विरार शहरातील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू. 

नुकतीच नाशिक मधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना ताजी असताना आज पालघर जिल्ह्यात विरार येथील रूग्णालयात आगीची भयंकर घटना घडली आहे.विरार येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

विरार येथील तिरुपती नगर मधील बंजारा हॉटेलच्या मागे असणाऱ्या विजय वल्लभ हॉस्पिटल मध्ये घडलेली घटना.या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदभता विभागात (ICU) मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली. आयसीयूधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची माहिती आहे.वॉर्डामध्ये ऑक्सिजन असल्याने आग लगेच सर्वत्र पसरली. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. आग लागली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलातील जवानांनी तात्काळ हालचाली करून काही रुग्णांना वाचवले. मात्र,१३ रुग्णांचा मृत्यू झाला.यामध्ये पाच महिला रुग्णांचा समावेश आहे,अशी माहिती वसई-विरार महापालिकेने दिलेली आहे.काही तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. 

मृत रुग्णाच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.