Home » या ग्रामपंचायतीने चक्क गावात वाटले कंडोम,जाणून घ्या यामागील कारण…
News

या ग्रामपंचायतीने चक्क गावात वाटले कंडोम,जाणून घ्या यामागील कारण…

राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घ्यायना काही केल्याने कमी होईना आणि अशामध्ये आता तर वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गिक आजारांनमुळे राज्यात चिंता वाढत चालली आहे.आता मात्र कोरोनाबरोबरच झिका व्हायरसचा देखील मानवी आरोग्याला धोका आहे.पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावामध्ये झिका  व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.त्यामुळे अनेक गावांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

बेलसर गावामध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य संस्था गावात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करत आहेत.झिका या  संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय सुरू आहे.या मधीलच एक उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून गावात कंडोमचे वाटप करण्यात आले आहे.पुढील चार महिने गावात महिलांना गर्भधारणा टाळन्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

यामुळे या  पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गावातील लोकांना कंडोमचे वाटप करण्यात आले आहे.पुरुषांच्या वीर्यामध्ये जास्त प्रमाणात झिका व्हायरस आढळत असल्यामुळे लैंगिक संबंध टाळण्यासाठी हा उपक्रम आहे.पुणे जिल्ह्यातील ७९ गावांत डेंग्यू आणि चिकणगुणीया या आजाराचे रुग्ण आढळत आहे या रुग्णांना झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे.या गावांतील लोकांना अलर्ट राहण्यासाठी सूचना दिल्या गेल्या आहे.तसेच स्थानिक प्रशासन व सर्व ग्रामपंचायत यांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

झिका व्हायरस काय आहे?

झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज या प्रजातीद्वारे पसरतो.एडीज डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे विषाणू पसरतात.परंतु हा आजार जीवघेणा नाही.मात्र,तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते.नवजात शिशुमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो.म्हणजे नवजात शिशुच डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकत.

झिका व्हायरसची लक्षणे?

या रुग्णांमध्ये ताप,अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे,सांधेदुखी अशी लक्षणे आढलुन येतात. डास चावल्यानंतर साधारणतः एका आठवड्या नंतर झिका व्हायरसची लक्षणे आढळून येतात.