Home » एक प्रसिद्ध अभिनेत्री ते राजकारणामधील एक प्रभावी व्यक्तिमत्व स्मृती इराणी यांचा प्रेरणादायी प्रवास…
Politician

एक प्रसिद्ध अभिनेत्री ते राजकारणामधील एक प्रभावी व्यक्तिमत्व स्मृती इराणी यांचा प्रेरणादायी प्रवास…

अभिनय क्षेत्रामधून राजकारणाकडे प्रवेश करणार्‍या सेलिब्रिटींची सध्या कमी नाही.यापैकीच एक नाव म्हणजे स्मृती इरानी होय.एक प्रसिद्ध अभिनेत्री ते राजकारणामधील एक प्रभावी व्यक्तिमत्व इथपर्यंतचा स्मृती इराणी यांचा प्रभावी प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.सुरवातीच्या काळामध्ये स्मृती इराणी यांनी मॉडलिंग केले होते व फेमिना मिस इंडिया या स्पर्धेसाठी त्या तयारी सुद्धा करत होत्या.

मात्र वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्मृती इराणी यांनी स्वतःमध्ये केलेल्या बदलांमुळे त्यांची प्रगती ही खूप वेगळ्या प्रकारे होत गेली.आज घडीला असणारे स्मृती इराणी यांचे व्यक्तिमत्व हे त्यांच्या मॉडलिंग च्या काळातील व्यक्तिमत्त्वाशी अजिबातच मिळतेजुळते नाही.स्मृती इराणी  या अभिनय,मॉडलिंग व राजनीती या सर्वच क्षेत्रांमध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला आहे. त्यांच्याकडे या प्रत्येक टप्प्यावर वयानुसार व क्षेत्रानुसार झालेले बदल आपण काही छायाचित्रांच्या माध्यमातून पाहणार आहोत.

टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी आपल्याला शालेय जीवनापासूनच राजकारणामध्ये रस असल्याचे खूप आधीच सांगितले होते. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.ते साल होते 1998.या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे आपली वाटचाल केली व टेलिव्हिजनवर एकता कपूरच्या क्यूँ की सास भी कभी बहू थी या लोकप्रिय मालिकेमध्ये त्यांना तुलसी या पात्राची भूमिका मिळाली.

तुलसी हे पात्र या मालिकेतील प्रमुख पात्र होते व या भूमिकेला प्रेक्षकांकडून जास्त प्रेम मिळाले व त्यांची लोकप्रियता सुद्धा भारताप्रमाणेच परदेशातील भारतीयांमध्ये सुद्धा खूप वाढली.याचा फायदा त्यांना पुढे राजकारणामध्ये मिळाला व उत्तर प्रदेश मधील अमेठी येथील निवडणुकांमध्ये त्यांनी राहुल गांधींना या लोकप्रियतेच्या जोरावर टक्कर दिली.क्यू की सास भी कभी बहू थी या मालिकेनंतर काही म्युझिक अल्बम मध्ये सुद्धा त्या दिसल्या.पण नंतरच्या काळात त्यांनी चित्रपटसृष्टी व अभिनयापासून जणू काही फारकत घेतली व राजकारणामध्ये त्या पूर्णपणे सक्रिय झाल्या.

राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांचे राहणीमान खूपच बदलले याची प्रचिती स्वतः स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या दोन छायाचित्रांद्वारे येते. यांपैकी एक छायाचित्र हे त्यांच्या मॉडेलिंगच्या काळातील छायाचित्र आहे .तर दूसरे छायाचित्र हे राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतरचे आहे. या छायाचित्रांना त्यांनी क्या से क्या हो गए देखते देखते असे कॅप्शन दिले आहे. स्मृती इराणी या राजकारणामध्ये असल्या तरीही त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत आजही संवाद साधणे चालू ठेवले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपली छायाचित्रे व्हिडिओज व आपल्या आयुष्यातील घटना चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतात.