Home » भाजपाच्या टिकेवर संजय राऊतांचे प्रतिउत्तर…
Politician

भाजपाच्या टिकेवर संजय राऊतांचे प्रतिउत्तर…

राज्यसभेमधील १२ खासदारांचे हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे.त्याविरोधात ते खासदार संसदेबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहे.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आंदोलनाला भेट दिली.त्यावेळी तिथे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे देखील तिथे उपस्थित होते.

या ठिकाणी जेव्हा शरद पवार दाखल झाले तेव्हा संजय राऊत यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली तो फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.याफोटो वरून विरोधक टीका करत असताना संजय राऊत यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

संजय राऊत शरद पवारांसाठी खुर्ची देत असतानाच्या फोटोवरून भाजप नेते त्यांच्यावर टीका करत आहे यासंबंधी त्यांना विचारले तर ते म्हणाले की,लाल कृष्ण अडवाणी हे जरी तिथे असते तर मी त्यांना पण खुर्ची दिली असती.

त्यांची प्रकृती,वय आणि त्यांना होणार त्रास…ते आंदोलनामध्ये माझ्यासोबत आले होते त्यांना चालतांनी त्रास होत होता त्यांच्या पायाला त्रास असल्यामुळे त्यांना मांडी घालून बसता येत नाही.अशावेळी महाराष्ट्रातील एका वडीलधाऱ्या व्यक्तीला मी खुर्ची आणून दिलेलं जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकृती आहे.

त्यानंतर ते पुढे म्हणाले,“त्या ठिकाणी जर लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशी,लालूप्रसाद यादव यांच्यापैकी जरी कोणी आले असते आणि जर त्यांना असा त्रास असता तर मी त्यांना देखील खुर्ची आणून दिली असती.कारण राजकारणामध्ये जरी मतभेद असले तरी ते पितृतुल्य लोक आहेत.

तसेच भाजपा नेत्यांच्या टिकेकर प्रतिउत्तर देतांना ते म्हणाले,बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरू आहेत आणि त्यांनीच मला हे संस्कार दिले आहे.आमचे आदर्श यशवंतराव चव्हाण हेच आहे.

अशाने महाराष्ट्र राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही.हा तुमच्या डोक्यामधील कचरा आहे साफ केला नाही तर लोक तुम्हाला एखाद्या डम्पिंग ग्राऊंड मध्ये गाडून टाकतील.

शरद पवारांना खुर्ची दिल्याने जर कोणाला त्रास होत असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही.वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणे हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.