Home » याकारणामुळे दोनदा शरद पवार यांची पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी हुकली…
Politician

याकारणामुळे दोनदा शरद पवार यांची पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी हुकली…

भारतीय राजकारण हा एक चढाओढ व कुरघोडींचा आखाडा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर अनेक प्रकारचे सिनेमे कथा-कादंबऱ्या आलेल्या आपण पाहिले आहेत.भारतीय राजकारणावर आधारित प्रत्येक नाटक किंवा चित्रपटामध्ये एक असे एक व्यक्तिमत्व असते जे आपल्या राजकीय पक्षाला बांधून ठेवणारा, हुशार, कुशाग्र आणि सर्वच पक्षांसोबत तितक्याच खेळीमेळीने कामा पलीकडे जाऊन वागणारा नेता असतो. हे पात्र सर्वांना चित्रपटांमध्ये बांधून ठेवते भारतीय राजकारणामध्ये सुद्धा असेच काही हुशार समाजकारणी व राजकारणापलीकडे जाऊन समाजा प्रति तळमळ असणारे नेते आहेत.

राजकारण व समाजकारणावर इतकी जबरदस्त पकड असून सुद्धा या नेत्यांना हवे ते इच्छित साध्य होते का तर याचे उत्तर अनेकदा नाही येते. हे सर्व सांगणे मागचे कारण म्हणजे आज आपण भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या काही वक्तव्याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल पटेल यांनी असे म्हटले आहे की शरद पवार यांना इतकी क्षमता असूनही एकदा नव्हे तर दोनदा पंतप्रधानपदाच्या खुर्ची पासून दूर ठेवले गेले आहे व यामागे तत्कालीन काँग्रेस पक्षातील स्वार्थी नेत्यांचा हात आहे असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांचा लोकसंग्रही खूप मोठा आहे. गेली तीस वर्षे प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांसोबत आहेत. काँग्रेस मध्ये असताना दोन वेळा काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांमुळे दोनदा शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी गेली होती व त्या वेळी सुद्धा मला हे धोरण पटले नव्हते असे प्रफुल्ल पटेल म्हटले होते. शरद पवार यांना पंतप्रधान पदासाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे असे त्यांचे मत आहे. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या पाठीमागे त्यांच्या राज्यातील खासदार ठामपणे उभे राहतात तसेच काहीसे महाराष्ट्रातही झाले पाहिजे.

सन  1991 मध्ये जेव्हा राजीव गांधी यांचे आकस्मिक निधन झाले तो सर्वच काँग्रेस जनांसाठी खूप मोठा धक्का होता व त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाचा व पंतप्रधानपदाचा दावेदार बनावे असे अनेक काँग्रेस जणांना वाटत होते मात्र या कल्पनेला काँग्रेस दरबारातील काही मोजक्या व गांधी परिवाराची जवळीक साधून असणाऱ्या नेत्यांनी छेद दिला आणि पी व्ही नरसिंहराव यांची त्यावेळी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.

1996 साली पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातर्फे पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून शरद पवार यांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली होती त्यावेळी काँग्रेसला आपण पाठिंबा देऊ जर शरद पवार पंतप्रधान होत असतील तसे एचडी देवेगौडा,मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांनी म्हटले होते मात्र यासाठी पी व्ही नरसिंहराव तयार नव्हते व पुन्हा एकदा शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली व काँग्रेसला एचडी देवेगौडा यांना बाहेरून पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा लागला.

ज्यावेळी पी व्ही नरसिंह राव यांनी आपली काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदारी संपली त्यावेळी पदावरून पायउतार होण्याअगोदर सीताराम केसरी यांचे नाव सुचवले होते.अशाप्रकारे वेळोवेळी शरद पवार यांना काँग्रेसमधील कथित दरबारी लोकांमुळे पंतप्रधानपदापासून दूर राहावे लागले होते असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या त्या वेळच्या विधानांवर काँग्रेस पक्षातील प्रमुखांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले गेले नाही मात्र एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने आपले नाव न येण्याच्या अटीवर असे म्हटले होते की शरद पवार यांनी 1978 साली काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती व पुन्हा एकदा ते  1986 मध्ये काँग्रेस पक्षामध्ये आले यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांच्या काँग्रेस प्रतीच्या एकनिष्ठते बद्दल शंका आहे.