Home » …म्हणून राणेंना ‘कोंबडी चोर’असे संबोधले जाते, संजय राऊत यांचं ट्विट वायरल!
Politician

…म्हणून राणेंना ‘कोंबडी चोर’असे संबोधले जाते, संजय राऊत यांचं ट्विट वायरल!

केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर व्यक्तव्य केल्यामुळे सध्या खुपच चर्चेत आहे.या मुळे त्यांना अटक देखील झाली होती आणि जामीनही मिळाली.राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये रंगलेले वाद सगळा महाराष्ट्र बघत आहे.अशावेळी एकमेकांबद्दल टीका करतांना दोन्ही बाजूंनी खुप वेळा जीभ घसरली आहे.

परंतु या वादादरम्यान गाजलेला किस्सा वादा म्हणजे नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ म्हणून चिडवले जात आहे ठिकठिकाणी त्यांचे कोंबडी चोर म्हणून बॅनर लावण्यात आलेले आहे.तसेच जेव्हा शिवसेना आणि राणेमध्ये वाद निर्माण होतो तेव्हा राणेंना कोंबडी चोर म्हणत राणेंवर टीका करतांना दिसतात.

परंतु राणेंना कोंबडी चोर का म्हणतात? हा प्रश्न अनेक जणांच्या मनात आलेला असेल! याविषयी आत्ताच्या नवीन शिवसेनिकांना देखील माहिती नसेल.दुसरे घोषणा देतात म्हणून त्यांचे पाहून हे देखील घोषणा देतात.शिवसेनिकांनाच माहीत नाही म्हंटल्यावर याबद्दल सामान्य लोकांना काय माहीत असेल हो की नाही?तर आज आपण राणेंना असे का म्हंटले जाते आणि याची सुरुवात कधीपासून झाली याविषयी माहिती बघणार आहोत.

नारायण राणे यांना सुरवातीच्या काळात बाळासाहेबांचे सर्वात विश्सासू म्हणून ओळखले जायचे आणि यामुळेच १९९९ मध्ये राणे शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री झाले होते.जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली होती तेव्हाच नारायण राणे यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच शिवसेनेत प्रवेश केला होता.राणे हे अगदी लहान असतांनाच शिवसेनेत ओढले गेले होते.तेव्हा ते मुंबई मध्ये चंबूर येथे राहत होते.बाळासाहेबांचे भाषण असले की ते त्या भाषणाला आवर्जून हजर राहायचे.

नारायण राणे यांच्या कुटूंबियांची परिस्थिती खुप हालाखीची होती त्यामुळे राणेंना अनेक कामे करावी लागत असत.अशावेळी नारायण राणें यांचा हनुमंत परब नावाचा एक मित्र होता.नारायण राणे आणि हनुमंत परब यांची जोडी चंबूरच्या सुभाषनगर मध्ये खूप चर्चित होती.असे म्हणतात की हे दोघे जण थिएटरच्या बाहेर ब्लॅक तिकीट विकत असत आणि गुंडगिरी देखील करत असे.

घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे या दोघांनी नकळत्या वयात कोंबड्या देखील चोरल्या होत्या आणि एकदा त्यांची चोरी पकडली गेली होती अशावेळी शिवसेनेचे नेते निलाधर ढाके यांनी या दोघांना सोडवले होते.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राणेंना अनेक सत्तेची पदे मिळत गेली.एवढेच नव्हेतर त्यांना मुख्यमंत्री पद देखील मिळाले होते.परंतु शिवसेनेची सत्ता गेल्यावर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.इथूनच नारायण राणे आणि शिवसेना यामध्ये वाद सुरु झाला.यावेळी नारायण राणे बरोबर अनेक आमदार देखील काँग्रेस मध्ये गेले होते आणि याचा बराच फटका शिवसेनेला बसला होता.

तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक सभा घेतली होती याच सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंना कोंबडी चोर असे संबोधले होते.यासभे मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी “या कोंबडी चोराला मुख्यमंत्री करून माझी चुक झाली” असे व्यक्तव्य देखील केले होते.तेव्हापासून आजपर्यंत नारायण राणे यांना शिवसेनिक ‘कोंबडी चोर’ म्हणून त्यांच्यावर टीका करतात.