Home » महाशिवरात्रीला शिवलिंगावर चूकूनही करु नका ‘या’ वस्तूंनी अभिषेक…!
Spiritual

महाशिवरात्रीला शिवलिंगावर चूकूनही करु नका ‘या’ वस्तूंनी अभिषेक…!

हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.पूर्वापर चालत आलेल्या धार्मिक प्रथा नुसार प्रत्येक महिन्यातील चतुर्दशी या तिथीला शिवाचे पूजन केले जाते.मात्र फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्रीला भगवान शिवाची विशेष पूजा अर्चा केली जाते.

यावर्षी एक मार्चला महाशिवरात्री साजरी केली जाईल.या दिवशी भगवान शिवांवर रुद्राभिषेक केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.मात्र हा अभिषेक करताना काही विशिष्ट गोष्टी जर भगवान शिवाला अर्पण केल्या तर यामुळे भगवान शिव क्रोधित होतात असेही मानले जाते.पुढील गोष्टी कधीही भगवान शिव यांना अर्पण करू नये.

१) तुळशीची पाने :- कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये तुळस ही अर्पण केली जाते.तुळशीची पाने नैवेद्यावरही वाहिली जातात मात्र चुकूनही भगवान शिव यांना अभिषेक करताना तुळशीची पाने अर्पण करू नयेत आणि विशेष करून महाशिवरात्रीला तर तुळशीची पाने कदापिही अर्पण करू नयेत.

२) दुधाची पिशवी किंवा गरम दूध :- भगवान शंकरांना अभिषेक करताना दुधाने अभिषेक केला जातो.ही प्रथा खूप पूर्वापार चालत आली आहे.मात्र भगवान शंकरांना दुधाचा अभिषेक करताना पाश्‍चराईज्ड दूध किंवा पिशवीतील दूध जसेच्यातसे अर्पण करू नये.तसेच गरम दूधही भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करू नये यामुळे ते क्रोधीत होतात.भगवान शंकरांना नेहमी थंड दुधाने अभिषेक करावा.

३) चाफ्याचे फुल :- कोणत्याही पूजेमध्ये आपण फुलांना अर्पण करून देवाला प्रसन्न करू इच्छितो मात्र भगवान शंकराचे पूजन करताना त्यांना कधीही चाफ्याचे फूल अर्पण करू नये.

४) तुटलेल्या अक्षता :- कोणत्याही पूजेमधये आपण तांदळाच्या अक्षता देवाला अर्पण करतो.भगवान शंकरांचे पूजन करतांना त्यांना अर्पण केल्या जाणाऱ्या अक्षता या कोणत्याही प्रकारे तुटलेल्या नसाव्यात यामुळे शंकरांचा क्रोध निर्माण होतो.

५) तुटलेली बेलाची पाने :- भगवान शिवाच्या पूजना मध्ये बेलाच्या पानांचे खूप महत्त्व असते.मात्र ही पाने नेहमी ताजी व न तुटलेली असावीत.तुटलेली कोमेजलेली पाने भगवान शंकरांना वाहू नयेत.

६) कुंकू :- भगवान शंकरांचे पूजन करताना त्यांच्या पिंडीला कुंकू लावू नये.माता पार्वती व गणेश यांच्या मूर्तीला आपण कुंकू लावू शकतो.

भगवान शंकरांना अभिषेक करतांना पंचामृताने अभिषेक केला जातो.भगवान शिवाचे पूजन करण्यासाठी पाणी,दही,तूप केशर आणि मध यांच्या मिश्रणा द्वारे पंचामृत बनवले जाते.महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरांमध्ये भगवान शिवाचा अभिषेक केला जातो.पहिल्या प्रहरामध्ये पाणी,दुसऱ्या प्रहरामध्ये दही,तिसऱ्या प्रहरामध्ये तूप आणि चौथ्या प्रहरामध्ये मधाने अभिषेक केला जातो.यावर्षी महाशिवरात्रि एक मार्च रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर प्रारंभ होणार आहे व चतुर्दशी दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता संपणार आहे.