Home » युधिष्ठिराच्या ‘या’ शापामुळे स्त्रिया दीर्घ काळ लपवू शकत नाहीत कोणतेही‌ सत्य…!
Spiritual

युधिष्ठिराच्या ‘या’ शापामुळे स्त्रिया दीर्घ काळ लपवू शकत नाहीत कोणतेही‌ सत्य…!

पुरूष आपली गुपितं स्त्रियांपासून अनेकदा लपवून ठेवतात याला कारण म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या मनात किंवा ओठांमध्ये एखादे गुपित दीर्घ काळ राहू शकत नाही.हे स्त्रीचे नैसर्गिक वर्तन असते.दोन स्त्रिया एकत्र आल्या की त्या गॉसिप करणार असे गृहीत धरले जाते.स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक व भावनिक संरचना ही वेगवेगळी असते व या दृष्टीने त्यांचे आचरण व वृत्ती ठरते.

मात्र स्त्री आणि पुरुष यांच्या या वर्तनाला सुद्धा अनेकदा प्राचीन कथांचे संदर्भ दिले जातात.या पैकी बऱ्याचशा कथा या पिढ्यानपिढ्या चालत आलेले असतात.त्यांना कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नसतो.अशीच एक कथा म्हणजे स्त्रिया दीर्घकाळ कोणतेही सत्य लपवून ठेवू शकत नाही.हे वर्तन म्हणजे महाभारतातील धर्मराज मानल्या जाणाऱ्या युधिष्ठिराच्या शापाचा परिणाम आहे असे म्हटले जाते.याला संदर्भ एका कथेचा दिला जातो.

महाभारत हे स्त्री मुळेच घडले असेसुद्धा म्हटले जाते.महाभारतामध्ये कौरव आणि पांडव हे एकाच वंशातील पुरुष एकमेकांविरुद्ध सत्तेसाठी लढले.या मध्ये दुर्योधन आणि कर्ण एका बाजूला होते तर पाच पांडव हे दुसऱ्या बाजूला होते.पाच पांडव हे युधिष्टिर,भीम,अर्जुन,नकुल आणि सहदेव होते.या पाच पांडवांची माता म्हणजे राणी कुंती होय.राणी कुंतीने विवाह अगोदर दुर्वास मुनींची खूप मनोभावे सेवा केली होती.या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी तिला पाच इच्छा पूर्ण होण्याचे वर दिला होता.

मात्र या वराचा उपयोग विवाह अगोदर करू नको असेही बजावले होते.मात्र कुंती ला मोह अनावर झाला नाही व तिने सूर्य देवाला प्रार्थना केली आणि सूर्य देवाच्या कृपेने तिला कर्ण हा मुलगा झाला.त्यावेळी कुमारिका असलेल्या कुंती ला या मुलाचा स्वीकार करणे शक्य झाले नाही व त्याचा तिने जन्मताच त्याग केला.अनेक वर्षे लोटली व यानंतर कर्ण हा कौरवांच्या बाजूने झाला.तो दुर्योधनाचा अगदी जवळचा मित्र बनला.महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण हासुद्धा महापराक्रमी होता.कुंती ने कर्ण हा आपलाच पुत्र असल्याचे सर्वांपासून लपवून ठेवले होते व यामुळेच महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांपैकी शूर वीर योद्धा असलेल्या अर्जुनाकडून कर्णाचा म्हणजे आपल्याच भावाचा वध झाला.

ज्यावेळी कर्ण रणांगणावर निपचित पडला होता त्या वेळी कुंती त्या ठिकाणी गेली व तिने युधिष्ठिराला कर्णाचे अंतिम संस्कार करण्यास सांगितले व त्यावेळी तिने सर्व पांडवांना कर्ण त्यांचा बंधू असल्याचे सत्य सांगितले.कुंतीने इतके मोठे सत्य लपवल्या मुळे आपल्या हातून भावाचा वध झाल्याचे पाहून युधिष्ठिर दुखावला व त्याने त्यावेळी असा शाप दिला की इथून पुढे कोणतीही स्त्री आपल्या मनामध्ये एखादे सत्य दीर्घ काळ लपवून ठेऊ शकणार नाही व त्याची प्रचिती आजच्या काळामध्येहि येते.