Home » लवंग आणि कापूर एकत्र जाळण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या…
Spiritual

लवंग आणि कापूर एकत्र जाळण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या…

घरामध्ये कापूर जाळण्याचे अनेक फायदे हे भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले जातात. भारतीय पूजेमध्ये कापूर नसेल तर पूजा घडतच नाही. कापूर जाळणे हे आरोग्यदायी व पर्यावरणीय दृष्टीने फायदेशीर आहे असे सांगितले तर निश्चितच नवल वाटेल. कापूर आणि लवंग चे फायदे खूप आहेत आज आपण लवंग आणि कापूर जाळण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

  1. कापूर आणि एक लवंग एकत्र एका वाटीमध्ये घेऊन जाळले असता त्यामुळे घरावर पडलेली कोणतेही अशूभ दूर होऊन घरामध्ये धनसंपत्ती व पैशांची नेहमी भरभराट राहते.

2. भारतीय हिंदू धर्म शास्त्रामध्ये कोणत्याही पूजेमध्ये कापूराला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. कोणतीही पुजा कापुरा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे मानले जाते. कोणत्याही पूजेला कापूर हा एक अविभाज्य भाग असतो.

3. लवंग आणि कापूर एकत्र जाळला असता घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते व मानसिक शांती सुद्धा प्राप्त होते.

4. सकाळी देवाची आरती करते वेळी कापुरा सोबत दोन लवंग जाळल्यास कोणतेही कार्य सुरू करण्यात व पूर्ण करण्यामध्ये जी बाधा निर्माण होते ती क्षणात नाहीशी होते.

5. खूप मेहनत करूनही धनप्राप्ती होत नसली तर कापूरचा वापर करून एक उपाय सांगितला जातो या उपायांद्वारे गोवरीचा वापर करून कापूर व लवंग जाळले असता सर्व प्रकारची पीडा दूर होते.

6. घरात विनाकारण वाद क्लेश कलह निर्माण होत असतील तर अशावेळी कापूर शुद्ध तुपा मध्ये बुडवून शेणाच्या गोवरी मध्ये जाळून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवले असता घरातील  व भांडणे दूर होतात

7. वैवाहिक आयुष्यामध्ये काही समस्या असतील, पती-पत्नीमध्ये भांडणे व वादविवाद होत असतील तर कापुराच्या 2 वड्या घेऊन उशीच्या खाली ठेवाव्यात व दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाच्या नजरेस न पडता हे कापूर जाळून टाकावे त्यामुळे निश्चितच आयुष्यातील ताणतणाव दूर होतात.