Home » घरामध्ये स्नानगृह व शौचालय मध्ये मीठ का ठेवले जाते,जाणून घ्या यामागील ५ अध्यात्मिक करणे…
Spiritual

घरामध्ये स्नानगृह व शौचालय मध्ये मीठ का ठेवले जाते,जाणून घ्या यामागील ५ अध्यात्मिक करणे…

शास्त्र आणि आरोग्य विषयीच्या वाढत्या जागरूकतेमुळे काही घटकांच्या अति खाण्यामुळे तब्येतीवर परिणाम होतो हे सर्व ज्ञात झाले आहे.त्यामुळे आहारातील मीठाचे प्रमाण कमी ठेवण्यावर भर दिला जातो. आहारामध्ये मिठाचे प्रमाण सातत्याने जास्त ठेवले असता वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात हे जरी खरे असले तरीही मिठाचे योग्य प्रमाण आहारात ठेवणे हेही तितकेच आवश्यक असते. मिठाचे आरोग्यासाठी जितके फायदे आहेत तितकेच वास्तुशास्त्र म्हणजे भारतीयांचे प्राचीन बांधकाम किंवा स्थापत्यशास्त्राचे अनुसार मिठाच्या उपायांद्वारे घरातील वातावरण हे निकोप ठेवण्यासही साहाय्य होते.

मिठाच्या वापराद्वारे वास्तू शरीर आणि अंतरात्मा या  तिघांचीही शुद्धी होते.मीठ हे एक खूप महत्त्वपूर्ण क्षार मानले जाते.वास्तुशास्त्रामध्ये मीठाच्या नैसर्गिक गुणधर्मांचा अवलंब करून काही उपाय केले जातात. मिठामध्ये विरघळून जाणे आणि कोरडे पडणे या दोन्ही गुणधर्मांचा सामावेश असतो. या दोन्ही गुणधर्मांचा वापर करून कोणत्याही अवकाशाची शुद्धी करण्याचे कार्य वास्तुशास्त्रामध्ये वर्णन केले आहे.

आपल्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जेमुळे शरीर आणि मन या दोन्हींमध्ये थकवा जाणवतो व काहीही नवीन करण्याची इच्छा राहत नाही अशा परिस्थिती मध्ये आपल्या स्वच्छतागृहांमध्ये व स्नानगृह मध्ये मीठ ठेवले असता नकारात्मक ऊर्जा दूर होते.त्याच प्रमाणे अंघोळीच्या वेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोड्याशा मिठाचा वापर केल्यास  आपल्या शरीरातील तणाव दूर होतो असे सुद्धा सांगितले जाते.

  1. भारतीय घरांमध्ये दररोज फरशी किंवा लादी पुसली जाते.यामागचे कारण म्हणजे घरातील धूळ दूर करून एका अर्थाने नकारात्मक ऊर्जेला दूर सारले जाते.फरशी किंवा लादी पुसण्यासाठी वेगवेगळ्या निर्जंतुकीकरण द्रव्यांचा वापर पाण्यामध्ये केला जातो. मात्र त्याऐवजी पाण्यामध्ये मीठ टाकले असता घरातील नकारात्मक ऊर्जा अगदी सहजपणे दूर केली जाऊ शकते व जंतूंपासून ही बचाव होतो.
  2. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घरामध्ये मीठ ठेवणे हे खूपच शुभ मानले जाते कारण मिठामध्ये वैश्विक ऊर्जा असते. कोणत्याही प्रकारच्या अशुभा पासून घराचा बचाव करण्याची ताकद मिठामध्ये असते असे वास्तुशास्त्रामध्ये मांडले आहे. त्यासाठी घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये पाण्यामध्ये मीठ घालून ठेवावे.या मिठाच्या पाण्या द्वारे घरामध्ये प्रवेश करू पाहणारी कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती शोषून घेतली जाते असे मानले जाते. मात्र हे पाणी व मीठ दररोज बदलणे आवश्यक असते.हे मिठाचे पाणी बदलल्यानंतर बाथरूम मध्ये किंवा बेसिन मध्ये टाकून द्यावे व घरामध्ये कुठेही पडू न देण्याची खबरदारी बाळगावी.
  3. मिठाचा वापर करणे हे केवळ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्तता नसते तर घरामध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी सुद्धा खूपच आवश्यक असते. घरामध्ये शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू ठेवल्या जातात या नाजूक आणि आकर्षक वस्तूंना स्वच्छ ठेवणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खूपच आवश्यक असते. मिठाचा वापर करून या वस्तूंची शुद्धी वेळोवेळी करावी असे वास्तुशास्त्र मध्ये सांगितले आहे.
  4. वास्तूशास्त्र आणि विज्ञान यांची सांगड घालून आपल्या झोपेविषयी समस्या सुद्धा सोडवल्या जाऊ शकतात‌.रात्री शांत झोप येण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते.आपल्या शयन कक्षामध्ये मीठ ठेवले असता झोप लागण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते.शांत झोप लागण्यासाठी व शरीराला तणावमुक्त करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून साधारण पंधरा ते वीस मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने सुद्धा शांत झोप लागण्यासाठी साहाय्य मिळते.
  5. आपल्या स्नानगृह मध्ये मीठ ठेवून संपूर्ण आरोग्य निरोगी राखण्यास साहाय्य मिळते असे म्हटले जाते. बाथरूम मध्ये कोणत्याही कोपऱ्यात एखाद्या भांड्यात मीठ ठेवले तर वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींवर उपाय केला जाऊ शकतो. स्नानगृह मध्ये मीठ ठेवल्यास घरातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत मिळते.