Home » लग्नाअगोदर वधु-वराला हळद का लावली जाते जाणून घेऊया यामागील कारण…
Spiritual

लग्नाअगोदर वधु-वराला हळद का लावली जाते जाणून घेऊया यामागील कारण…

भारतीय संस्कृतीत लग्न सोहळ्यातील सगळ्या विधींना खुप महत्व दिले जाते.लग्नाअगोदर आणि लग्नानंतर अनेक विधी पार पाडल्या जातात.यामधील अनेक विधी वधू आणि वरांला पुढील आयुष्यात सुख-समाधान मिळावे यासाठी केल्या जातात.आजकाल प्रि-वेडिंग सेलिब्रेशन खुपच लोकप्रिय होत चालले आहे.

त्यामुळे साखरपुडा,मेंहदी,हळद,संगीत असे विविध कार्यक्रम धुमधडाक्यात करण्याची पद्धत रुजू होत चालली आहे.या सर्व विधींमध्ये वधूवरांना हळद लावण्याचा विधीला खुप महत्व दिले जाते.वधू-वराला हळद लावण्यामागे अनेक शास्त्रीय कारणे असु शकतात.प्रत्येकाच्या मनात लग्नात वधू आणि वराला हळद का लावली जाते या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते.

लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो.तुम्हाला कधी विचार आला का कि वधु आणि वर यांना हळद का लावली जाते.आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेल्या या प्रथे मागे काय कारण असेल? काही भागात हळदीने दृष्ट देखील काढली जाते.नव्याने सुरुवात करणाऱ्या वधु वराच्या आयुष्याला वाईट नजर लागू नये म्हणून लग्नाआधी हळद लावली जात असावी.

तर आज आपण जाणून घेऊया लग्नाआधी वधू-वराला हळद लावण्यामागचे महत्व…

१) हळद लावल्याने सौंदर्य वाढते : हळदीमध्ये असणाऱ्या अनेक अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे आपली त्वचा स्वच्छ आणि निर्जंतूक होते.लग्नाचा दिवस हा प्रत्येक वधू आणि वरासाठी खुप महत्त्वाचा असतो.लग्नामध्ये प्रत्येकाचे लक्ष वधु-वराकडेच असते.यावेळी त्यांनी इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसने हे अपेक्षित असते.पूर्वीच्या काळी आतासारख्या ब्युटी ट्रिटमेंट आणि ब्युटी पार्लरची सुविधा उपलब्ध नव्हती.त्यामुळे वधू आणि वराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लग्नात त्यांना हळद लावण्याची प्रथा रूजू झाली.

२) पिवळा रंग शुभ असतो : पिवळा रंग हा ऐश्वर्य आणि समृद्धीचा प्रतिक आहे.म्हणूनच काही लग्नमध्ये नववधूला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायला लावतात.पिवळ्या रंगाला धार्मिक महत्व आहे.लग्नाच्या आदल्या दिवशी पार पडणाऱ्या विधींमध्ये देखील वधू आणि वर पिवळ्या रंगाचे कपडे घालतात.पिवळा रंग शुभ असतो त्यामुळे देखील लग्नात हळदी समारंभ सुरू करण्यात आला असावा.

३) हळदीचे धार्मिक महत्व : लग्नामध्ये वधूवरांची सौभाग्य गाठ बांधली जाते.तुम्हाला माहीतच आहे की हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं लेण आहे आणि तसेच हळदीला प्रत्येक धार्मिक विधीमध्ये महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.हळदकुंकू लावताना अगोदर हळद आणि मग कुंकू लावले जाते.हळद पवित्र मानली जाते त्यामुळे लग्नात वधू आणि वराला हळद लावली जात असावी.

४) हळद आहे आरोग्यदायी : हळद हा एक मसाल्याचा पदार्थ तर आहेच त्याचबरोबर आरोग्यासाठी देखील खुप उपयुक्त आहे.हळदीचा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो.त्वचेसंबंधित असणाऱ्या समस्या हळदीचा लेप लावल्याने दूर होतात.आयुर्वेदामध्ये देखील हळदीला महत्त्वाचे स्थान आहे म्हणूनच वधू-वराला उत्तम आरोग्य लाभावे म्हणून देखील लग्नात हळद लावण्याची प्रथा सुरू झाली असावी.

५) डेड स्किन काढण्यासाठी : त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी हळद खुप उपयुक्त ठरते.हळदीचा आपण स्क्रबर म्हणून देखील वापर करू शकतो यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.डेड स्किन काढल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तुमची त्वचा फ्रेश दिसू लागते. त्वचेला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजनचा मिळाल्यामुळे रिलॅक्स वाटते.लग्नाच्या धावपळीमुळे वधूवर आणि घरातील मंडळी थकुन गेलेली असतात.अशावेळी हळदीच्या विधींमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि ताणतणावदेखील कमी होतो.

६) प्रजनन शक्ती वाढते : हळदीला प्रजनन शक्तीचे दर्शक मानले जाते.यामुळे हळद लावल्याने स्त्रियांचा मासिक काळ सुरळीत होतो आणि गर्भधारनेची शक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे हळद लावण्यामागे मुलगी सासरी गेल्यावर त्या घरी निरोगी संतती येऊन भरभराट व्हावी हा देखील यामागे उद्देश असतो.