Home » ‘या’ दिवशी नखे आणि केस कापली तर होताल मालामाल…!
Spiritual

‘या’ दिवशी नखे आणि केस कापली तर होताल मालामाल…!

आपल्या शारीरिक स्वच्छतेसाठी केस,नखे इत्यादींची स्वच्छता राखणे आवश्यक मानले जाते.केस आणि नखांमध्ये साचलेली घाण निरनिराळ्या आजारांना जणू काही आमंत्रण देते.यासाठी वाढलेली नखे योग्य वेळी कापून टाकणे महत्त्वाचे ठरते.भारतीय संस्कृती मध्ये आपल्या प्रत्येक कार्यासाठी एक योग्य वेळ निश्चित केलेली आहे.काही दिवस नखे आणि केस कापण्यासाठी शुभ मानले जातात तर काही  दिवस असे असतात की या दिवशी नखे आणि केस कापले असता अशुभ घटना घडतात किंवा आपल्यावर दारिद्र्य, कर्ज यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.अशाच काही दिवसांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या दिवशी नखे आणि केस कापणे हे शुभ नसते आणि या दिवशी शक्यतो केस आणि नखे कापणे टाळावे.

१) कोणत्याही शुभ दिवशी किंवा सणाच्या वेळेस नखे आणि.केस कापणे हे निषिद्ध मानले जाते.रात्रीच्या वेळेस किंवा संध्याकाळी नखे कापू नयेत असे घरातील वडिलधारी मंडळी सांगतात.

२) प्रत्येक दिवसाचे विशेष असे महत्व मानले जाते.प्रत्येक दिवस हा विशिष्ट देवता किंवा ग्रहाशी निगडित मानला जातो.प्रत्येक दिवसा शी निगडीत कार्यही त्या दिवशी पार पाडावी.व्यक्तीचे आचरण,व्यवसायाशी संबंधित ग्रहाला ज्याप्रमाणे समाधानकारक वाटतात त्याच पद्धतीने पार पाडली जावीत असे सांगितले जाते.प्रत्येक कार्य त्या विशिष्ट पद्धतीने पार पडले  तर तुम्ही स्वतःसाठी शुभ कार्य केले आहे असे मानले जाते.

३) सोमवार हे भगवान शिव यांना समर्पित आहेत आणि चंद्राद्वारे राज्य करतात.मंगलवार भगवान हनुमानास समर्पित असून मंगळाचा प्रभाव असतो.बुधवार हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहेत आणि बुधवर राज्य करतात.गुरुवार हे भगवान विष्णूला समर्पित आहेत आणि त्यांचे बृहस्पतिवर राज्य असते.शुक्रवार हे माँ दुर्गाचा अवतार आहे व माँ संतोषीला समर्पित आहे आणि शुक्र ग्रहाचे राज्य आहे. शनिवार भगवान शनीला समर्पित असून शनि ग्रहाचे राज्य असते.रविवार हा सूर्यदेव यांना समर्पित आहे आणि सूर्यावर त्याचे राज्य आहे.

४) हिंदू धर्मामधील सोमवार हा चंद्राशी निगडित वार मानला जातो.या ग्रहाचा प्रत्यक्ष संबंध किंवा प्रभाव हा आपल्या मानसिक आरोग्यावर पडत असतो त्यामुळे सोमवारी केस किंवा नखे कापणे हे अतिशय अशुभ मानले जाते.कारण यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम घडू शकतो असे मानले जाते.

५) मंगळवारी नखे काढणे,केस कापले किंवा दाढी करणे या गोष्टी अशुभ मानल्या जातात कारण यामुळे आपले आयुष्य अल्पायुषी बनते असे सांगितले जाते.

६) केस आणि नखे काढण्यासाठी अतिशय उत्तम असा वार म्हणजे बुधवार होय असे हिंदू साहित्य व ग्रंथात सांगितले आहे.बुधवारी केस आणि नखे कापली असता माता लक्ष्मीची कृपा या घरातील व्यक्तींवर सदैव टिकून राहते आणि घरामध्ये आरोग्यसोबत धन,यश येते असे सांगितले जाते तसेच दीर्घकाळपर्यंत  देवी लक्ष्मी या घरामध्ये वास करते असेसुद्धा म्हणतात.

७) गुरुवारी  केस किंवा नखे कापणे हे अतिशय अशुभ आणि माता लक्ष्मीची अवकृपा ओढण्यास आमंत्रण देणारे मानले जाते.गुरुवार हा वार भगवान विष्णूचा वार मानला जातो.भगवान विष्णू व माता लक्ष्मी पतीपत्नी होते.गुरुवारी केस आणि नखे कापणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे मानले जाते म्हणून या दिवशी शक्यतो केस आणि नखे कापणे टाळावे.

८) शुक्रवार वर शुक्र या सौंदर्याशी निगडित ग्रहाचा प्रभाव असतो.या वाराला प्रसिद्धीचा वार मानले जाते.या दिवशी केस आणि नखे कापणे ही अतिशय शुभ असते शुक्रवारी केस आणि नखे कापल्या मुळे आपल्याला यश संपत्ती मोठ्या प्रमाणात प्राप्त होते असे सांगितले जाते.

९) शनिवार हा भगवान शनिदेवांचा वार मानला जातो.या दिवशी केस किंवा नखे कापणे हे अतिशय घातक मानले जाते यामुळे भगवान शनिदेवांचा कोप होऊ शकतो.तसेच अवेळी अपघाती मृ’त्यू सुद्धा येऊ शकतो असे काही ठिकाणी वर्णन केले आहे.

१०) रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे बहुतांश जण याच दिवशी केस आणि नखे कापण्यास प्राधान्य देतात.मात्र रविवार हा भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने केस व नखे  कापण्यासाठी अशुभ दिवस आहे.या दिवसावर सूर्याचा प्रभाव असतो व त्यामुळे या दिवशी केस कापल्यामुळे आपले मानसिक आरोग्य,सुख,शांती,सुबत्ता या सर्वांचा नाश  होतो असे सांगीतले जाते त्यामुळे रविवारी शक्यतो केस आणि नखे कापणे टाळावे