Home » हिंदू संस्कृतीमधील ‘नथ’ घालणे ‘हे’ फक्त ‘नखरा’ नसून आहे वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत फायदेमंद…!
Spiritual

हिंदू संस्कृतीमधील ‘नथ’ घालणे ‘हे’ फक्त ‘नखरा’ नसून आहे वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत फायदेमंद…!

भारतीय संस्कृतीमध्ये साजशृंगाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्रिया विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान करताना दिसतात. यामागे केवळ नटने मुरडणे इतकाच उद्देश नसून काही शास्त्रीय आधार सुद्धा असतो. असाच एक दागिना म्हणजे नथ किंवा नाकातली नथनी होय. नथ हा दागिना कोणताही पारंपारिक वेष परिधान केल्यानंतर अगदी हमखासपणे घातला जातो व मिरवला ही जातो.

पूर्वापार चालत आलेला नथ हा दागिना आता ट्रेन्डमध्ये आला असून वेगवेगळ्या प्रकारातील नथ आपल्याला पहावयास मिळतात. नथ घालण्यासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात जसे की मंगळसूत्र हे केवळ विवाहित स्त्रिया घालू शकतात. मुळात नथ घालण्या मागचे कारण काय आहे हे आज आपण जाणून घेऊया.

1) नथ घालण्याची परंपरा ही मध्यपूर्व देशांमधून भारतामध्ये मुघल काळामध्ये आली असे काही इतिहासकालीन साहित्यामध्ये आढळून येते. त्याचप्रमाणे भारतीय आयुर्वेदातील सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा नथ घालण्याचे फायदे वर्णन करण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळी नथ ही विशेष करून मुलीच्या लग्नाच्या वेळी तिला परिधान करावयास सांगितले जात असे.

नथ घालण्यासाठीचा धार्मिक आधार म्हणजे विवाहाच्या वेळी मुलीच्या नाकामध्ये नथ या दागिन्याचा मान असतो व याद्वारे शुभविवाहाची आद्य देवता पार्वती देवीला नमन केले जाते असे मानले जात असे. काही भागांमध्ये पतीच्या मृ’त्यू’नंतर विवाहित स्त्रीच्या नाकातील नथ काढून ठेवली जाते म्हणजेच याला सौभाग्याचे लेणे ही मानले जाते. पारंपारिक आधार पाहिला तर विवाहयोग्य वयामध्ये प्रत्येक मुलीला आपले नाक टोचून घ्यावे लागत असे.

2) नथ घालण्याचे स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा काही फायदे सांगितले जातात. नथ ही स्त्रियांच्या डाव्या नाकपुडी मध्ये छिद्र पाडून घातली जाते. या डाव्या बाजूचे नाकपुडीचा संबंध हा स्त्रियांच्या प्रज्योत्पादनासाठीच्या अवयवांशी निगडित आहे. यामुळे प्रसूती कळा सहन करण्यास सहाय्य मिळते असे सांगितले जाते तसेच डाव्या नाकपुडीवरील विशिष्ट ठिकाणी नाक टोचले असता मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनाही कमी होतात म्हणून मुलींनी व स्त्रियांनी नाक टोचावे असे काही ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे.

3) स्त्रियांच्या आरोग्याशी  निगडित असलेल्या काही उपयुक्त धातूंचा उल्लेख या विविध आरोग्यविषयक साहित्यामध्ये आपल्याला आढळून येतो. नाकामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या नथ किंवा नथण्या घातल्यामुळे शरीरातील वात, उष्णता, पित्त यांचे संतुलन राखण्यास मदत होते तसेच अनावश्यक मानसिक असंतुलन सुद्धा टाळण्यासाठी सहाय्य मिळते.