Home » हिंदु धर्मात महिलांना नारळ का फोडू दिले जात नाही जाणुन घ्या यामागील कारण…
Spiritual

हिंदु धर्मात महिलांना नारळ का फोडू दिले जात नाही जाणुन घ्या यामागील कारण…

हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाणारे फळ म्हणजे नारळ.नवीन कामाची सुरुवात करायची असेल जसे की समारंभ,बांधकाम,दुकानाचे उद्घाटन करायचे असेल,सण,पुजा,एखादी नवीन वस्तू खरेदी केली किंवा एखाद्या कामाची सुरुवात करायची असेल तर आपण नारळ फोडूनच त्या कामाची सुरुवात करतो.पुर्वीपासून सुवासीनींची खणा-नारळाने ओटी भरली जाते आणि हीच प्रथा आणखी आहे.नारळाला श्रीफळ म्हणुन देखील ओळखले जाते.जेव्हा भगवान विष्णु पृथ्वीवर अवतारले होते तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत तीन गोष्टी आणल्या होत्या त्या म्हणजे लक्ष्मी,नारळ आणि कामधेनु.

श्री म्हणजे लक्ष्मी तर लक्ष्मी चा अर्थ म्हणजे नारळ.श्रीफळ हे भगवान विष्णुचे फळ आहे.नारळामध्ये ब्रह्मा,विष्णु आणि महेश यांचा वास असतो असे मानले जाते.श्रीफळ भगवान शिव यांचे सर्वात आवडते फळ आहे.असे मानले जाते की नारळामध्ये असणारे तीन डोळे म्हणजे त्रिदेव.नारळाचे सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते.स्त्री ही घरातली गृहलक्ष्मी असते तिच्या हातून कोणतीही वाईट गोष्ट घडू नये या उद्देशाने देखील महिलांना नारळ फोडू देत नसेल.

असे म्हणतात कुलदेवतेला नारळ चढवल्यामुळे धनाची समस्या दुर होते.भारतीय संस्कृतीत पूजेच्या साहित्यात नारळाला खुप महत्त्वाचे स्थान आहे.भारतीय संस्कृतीत स्त्रियांना नारळ फोडु देत नाहीत.महिला मंदिरामध्ये पूजा करत असतांना स्वतः कधीच नारळ फोडत नाही दुसऱ्या मुलाकडून किंवा पुरुषाकडून फोडून घेते परंतु स्त्री कधीच नारळ फोडत नाही.महिला नारळ फोडत नाही या मागे नेमके काय कारण आहे…

चला तर मग जाणून घेऊया महिलांनी नारळ न फोडण्या मागील कारण…

नारळ हे बीज रूपात असते म्हणून नारळाला प्रजनन उत्पादन करणारा घटक मानले जाते.हे यामागील एक प्रमख कारण आहे की नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे.नारळ हे बीजरूपी असल्याने त्याचा संबंध प्रजनन क्षमतेशी असतो हे यामागील कारण आहे.महिला बाळाला बीजरूपातच जन्म देतात.त्याच्याशीच नारळाचा संबंध आहे.म्हणूनच हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार नाही.हिंदू धर्मामध्ये स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते.

शास्त्रानुसार असे सांगितले जाते की स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ आहे.यामागे अशी कथा सांगितली जाते की ब्रह्मऋषी विश्‍वमित्र यांनी विश्‍वाची निर्मिती केली.परंतु विश्‍व निर्माण करण्यापूर्वीच त्यांनी नारळाची निर्मिती केली होती.तेव्हापासून नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जाते.नारळ हे बीजरूपी असल्याने त्याचा संबंध प्रजननक्षमतेशी असतो स्त्री ही बीजरूपातच बाळाला जन्म देते त्यामुळे महिलांनी नारळ फोडणे अशुभ मानले जाते.