Home » विवाहीत महिला पायात जोडवे का घालतात? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारण…
Spiritual

विवाहीत महिला पायात जोडवे का घालतात? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारण…

दाग-दागिने म्हंटल म्हणजे स्त्रियांची आवडती वस्तु.एखादा कार्यक्रम,लग्न किंवा कोणताही समारंभ असला की स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारची दागिने घालताना आपल्या नजरेत आल्याच असतील.मुलीचं लग्न झालं की तिला गळ्यात मंगळसूत्र,पायात चैन,हातात बांगड्या,नाकात नथ हे सगळे अलंकार घालावे लागतात त्याचबरोबर लग्नात मंगळसुत्र घातल्याबरोबर पायामध्ये जोडवे घातली जातात.हे सर्व सौभाग्याचे अलंकार आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जोडवे हे सोळा शृंगारापैकी एक आहे.या प्रत्येक अलंकार घालण्यामागे काहींना काही कारण आहे.भांगामध्ये कुंकू भरणे,गळ्यात मंगळसूत्र ते पण सोन्याचं आणि पायात जोडवे ते चांदीचेच.चांदीचे जोडवे घालण्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे.परंतु कधी विचार आला का तुमच्या मनात की पायात जोडवे का घातली जातात?

विवाहित महिला पायाच्या बोटांमध्ये चांदीचे जोडवे घालतात. जास्तीत जास्त महिला अंगठ्याजवळील बोटात जोडवे घालतात.या जोडव्यांना बिछवा देखील म्हणले जाते.प्रामुख्याने जास्त करून पायात चांदीचे जोडवे घातली जातात.जोडवे घालणे हे स्त्रियांच्या सौभाग्याचे लक्षण मानले जाते.त्यामुळे लग्नानंतर प्रत्येक विवाहित महिला  पायामध्ये चांदीची जोडवी घालतात,एकदा जोडवी घातली की पुन्हा पायातून कधी काढत नाही.

रुढी,प्रथा,परंपरा म्हणून जरी जोडवी घातली जात असली तरी त्यामागे काही शास्त्रीय कारणेही आहेत तसेच आरोग्यविषयक अनेक फायदे देखील आहेत.

चला तर मग पायात जोडवे घालण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घेऊया..

१) जोडवे हे अ‍ॅक्युप्रेशरच काम करतात यामुळे तळपायापासून तर नाभीपर्यंतच्या सर्व नसांना फायदा होतो.जोडव्यांमुळे पायातील बोटांवर दाब पडतो त्यामुळे स्त्रियांच्या गर्भाशयाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत मिळते. तसेच यामुळे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहते.

२) पायाच्या बोटांचा संबंध थेट पोट आणि गर्भाशयाशी असतो.त्यामुळे जोडवे घातल्यामुळे या नसांवर दबाव पडतो.त्यामुळे पोट आणि गर्भाशय निरोगी राहते.जोडवी ही स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवन्यास देखील मदत करतात.

आयुर्वेदानुसार स्त्रियांच्या पायातील अंगठ्या जवळच्या बोटाचा संबंध थेट गर्भाशयाशी असतो.जोडवे घातल्यामुळे विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब असल्यामुळे गर्भाशयाचा रक्तपुरवठा देखील सुरळीत राहतो आणि त्याबरोबर स्त्रियांची गर्भधारण क्षमता निरोगी राहते.यामुळे मासिक पाळी मध्ये येणाऱ्या समस्या कमी होतात आणि मासिकपाळी नियमित येते.

३) असे म्हणतात महिला चांदीचे जोडवे घालतात कारण चांदी ही चंद्राशी संबंधीत आहे.चंद्र हा मनाचा शीतल आहे.त्यामुळे चांदी घातल्यामुळे मानसिक शांतता लाभते.

४) महिलांना घरातील सर्व काम करावे लागते यामुळे थकवा जाणवतो आणि ताणतणाव देखील येतो.जोडवे घातल्यामुळे ताणतणाव कमी होतो असे म्हणतात.

५) चांदीचीच जोडवे असतात कारण विज्ञानामध्ये सांगितले आहे की चांदी हा विजेचा सुवाहक असतो या मधून वीज सहज वाहते.त्यामुळे चांदीची जोडवे घातल्याने जमिनीतील ऊर्जा जोडव्यामार्फत शरीरात येते.त्यामुळे शरीर नेहमी उत्साही राहते.

६) जोडवे घातल्यामुळे हृदय नियंत्रणात राहते.तसेच मांस पेशी सुरळीत कार्य करतात आणि शरीर संतुलणात राहते.तसेच जोडवे घातल्यामुळे थायरॉइडचा धोका कमी संभवतो.