Home » ‘तिरुपती बालाजी’ या मंदिरात भक्तांनी दान केलेल्या केसांचं नेमकं काय करतात,जाणून व्हाल थक्क…
Spiritual

‘तिरुपती बालाजी’ या मंदिरात भक्तांनी दान केलेल्या केसांचं नेमकं काय करतात,जाणून व्हाल थक्क…

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.मंदिराच्या परिसराला बघूनच या मंदिराच्या श्रीमंतीची झलक दिसते.भारतातील हे एकमेव स्थान आहे जिथे मोठ्या संख्येने स्त्रिया त्यांचे नवस पूर्ण झाल्यावर मुंडण करतात.तिरुपती बालाजी मंदिरात ज्यांनी केश दान त्याला साक्षात देवी लक्ष्मी चा आशीर्वाद मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

यासह सर्व समस्या दुर होतात असा देखील भक्तांचा विश्वास आहे.इथे लोक सर्व केस दान करतात यामागे देखील भक्तांची अशी श्रद्धा आहे की केस दान केल्याने देवी लक्ष्मी ही आपल्या सर्व दुःखांचा आणि पापांचा नाश करते.प्रत्येक दिवशी सुमारे २ हजार लोक या मंदिरात केस दान करतात.

भारतातील लोक येतातच परंतु याच बरोबर देशविदेशातील पर्यटक दूरदूर ठिकाणावरून देखील या मंदिराला भेट देतात.एवढेच नाही तर अनेक भक्त केलेले दान देखील चर्चेत असते.येथील दानाच्या हुंडीमध्ये नोटांची बंडल किंवा सोन्या-चांदीच्या विटा अशी मौल्यवान वस्तू दान म्हणून टाकतात ते पण निनावी पद्धतीने.

तिरुपती बालाजीला अनेक भक्तांनी सोन्या-चांदीचे दागिने देखील केलेले आहे.या मंदिराच्या श्रीमंतीची झलक फक्त मंदिराच्या परिसरात दिसत नाही तर तिरुपती या शहराची भरभराट पाहून भक्तांची चुणूक दिसून येते.

असो आपण आज दुसऱ्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे या मंदिरामध्ये दान केलेल्या केसांचं नेमकं काय केलं जातं…

तिरुपती बालाजी हा नवसाला पावणारा देव आहे त्यामुळे अनेक भक्त येथे नवस बोलण्यासाठी आणि नंतर तो फेडण्यासाठी येत असतात.पूर्वी फक्त नवस पूर्ण झाल्यावर तो नवस फेडण्यासाठी केशदान केले जात होते परंतु आता सर्रास भाविक आवर्जून भक्तिभावाने केस दान करताना दिसून येतात.पुरुषतर केशदान करतातच त्याबरोबरच महिला देखील केशदान करतात.

या मंदिराच्या बाहेरील बाजूला एक  इमारत आहे त्या ठिकाणी लोक केस दान करतात. जे लोक केस काढतात त्यांना पैसे देण्याची गरज नाही त्यांना पैसे दिले तरी ते घेत नाहीत.देवस्थान वाले त्यांनापैसे देतात.तुमच्या मधील देखील बरेच जण तिरुपती बालाजीला जाऊन केशदान करून आलेच असतील.

परंतु तुम्हाला माहीत आहे का,एवढ्या भक्तांनी दान केलेले हे केस नेमके कुठे जात असतील ? तुम्हाला कधी प्रश्न पडला का की,मंदिर प्रशासन भक्तांनी दान केलेल्या या केसांचं काय करत असेल? तर अर्पण केलेल्या या केशांचा मंदिराच्या ट्रस्ट तर्फे लिलाव केला जातो.यामधून मंदिराला जवळपास १ ते १.५ कोटींचे उत्पन्न मिळते.असे म्हणायला हरकत नाही की तिरुपती बालाजी हे एकमेव ठिकाण आहे जे केस विकुन एवढी रक्कम मिळवतात! 

बर या केसांचं पुढे काय होत असेल?तर या केसांपासून कृत्रिम केस बनवले जातात.

विदेशामध्ये केसांना प्रचंड मागणी आहे.चित्रपट,सिरीयल,मॉल मध्ये आपण जे नकली केस किंवा विंग्स बनवण्यासाठी आणिहेयर एक्स्टेन्शन साठी या केसांचा उपयोग केला जातो.तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देखील या कृत्रिम केस वापरतात.दरवर्षी तिरुपती बालाजी या मंदिराला ५ कोटीहून अधिक भाविक भेट देतात.यापैकी बरेचसे भाविक मुंडण करून केस दान करतात.

या केस विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग मंदिरातर्फे दुधाची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे दूध मंदिरात दर्शनासाठी भविकांसोबत आलेल्या लहान मुलांना आणि महिलांना देण्यात येते.त्याबरोबरच या दुधाचा उपयोग पुढे तूपासाठीही केला जातो.ह्या तुपाचा वापर देवाचा प्रसाद बनवण्यासाठी केला जाते.बघितलं का,लोकांनी दान केलेल्या केसांमागे किती मोठा रहस्य आहे ते..!