Home » मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण आणि महत्त्व…!
Spiritual

मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण आणि महत्त्व…!

भारतात दरवर्षी साधारणपणे 15 जानेवारीला मकर संक्रांत हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी आकाशात रंगबिरंगी पतंगांचे आवरण आपल्याला दिसते.सर्वजण जुने क्लेश दूर करून एकमेकांना तिळगूळ देऊन गोड बोलण्याचे संदेश देतात. मकर संक्रांत हा सण नेमका का साजरा करतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1) संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशी म्हणून दुसऱ्या राशीमध्ये होणारे संक्रमण आहे. संपूर्ण वर्षभरात अशाप्रकारे बारा वेळा हे संक्रमण होते. मात्र मकर संक्रांतीच्या वेळी होणाऱ्या संक्रमणास विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या वेळी सूर्याचे दक्षिणायणा मधून उत्तरायाणात भ्रमण सूरु होते व थंडीचा मौसम संपतो. याच हंगामापासून शेतीची ही महत्त्वाची कामे सुरू होतात. मकरसंक्रांती हा सण सूर्याच्या भ्रमणाशी निगडित आहे व याला निसर्गचक्रामध्ये सुद्धा महत्त्व दिले जाते.

2) धार्मिक ग्रंथांमध्ये संक्रांतीचे महत्त्व वर्णन करताना असे सांगितले आहे की याच दिवशी भगवान विष्णूंनी दैत्यांनी सर्वत्र माजवलेल्या संहारापासून पृथ्वीतलावरील मनुष्यांची सुटका करण्यासाठी या दैत्याने शीर धडावेगळे करून या शिरांना डोंगररांगांमध्ये पुरले होते व सर्वत्र यामुळे शांतता व चैतन्य पसरले. संक्रांतीच्या दिवशी याच कथेचा आधार घेऊन साधना किंवा ध्यान करणे खूपच शुभ असते असे मानले जाते कारण या दिवशी सर्वत्र चैतन्य व ज्ञानाचा संचार होत असतो असे मानले जाते.

3) मकर संक्रांत ही कोणत्या देवतेचे पूजन करण्यासाठी असते याविषयी सुद्धा अनेक कथा सांगितल्या जातात. मकर संक्रांत ही सूर्य देवतेचे पूजन करण्यासाठी साजरी केली जाते. सूर्याला साक्षात परब्रह्म मानले जाते

4) संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाची सुरुवात होते. या दिवशी मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते म्हणूनच या दिवशी आलेला मृत्यू हा मोक्षप्राप्ती असतो असे मानले जाते. महाभारतामध्ये असा संदर्भ दिला जातो की या दिवशी भीष्म पितामहांनी आपला देह त्याग केला होता. उत्तरायाणा पासून चांगल्या व शुभ कार्याची सुरुवातही केली जाते.

5) मकर संक्रांतीशी निगडित एक कथा ही सूर्यदेव व शनि देवांशी संबंधित आहे. शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत.सूर्यदेव व शनी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता कारण शनि देवांची माता छाया यांनी आपला मुलगा व सूर्य देवांचा दुसरा मुलगा यमराज यांच्यासोबत  दुजाभाव केला होता म्हणूनच सूर्यदेवांनी शनिदेव व त्यांच्या मातेला त्यागले होते याचा राग म्हणून शनिदेव व त्यांच्या मातेने सूर्य देवाला कुष्ठ निर्माण होण्याचा शाप दिला होता आपल्या वडिलांवरील हा शाप टाळावा यासाठी यमराजाने कठोर तपश्चर्या केली होती. मात्र या शापाने क्रोधित होऊन शनी देव व त्यांच्या मातेचे घर सूर्यदेवांनी अग्नीने  भस्मसात केले होते व यानंतर शनिदेव व त्यांच्या मातेचे नशिबाचे चक्र पालटले व त्यांना अतिशय हालाखीच्या दिवसांना सामोरे जावे लागले. हेमराज यांनी त्यांच्या प्रति दया म्हणून सूर्य देवांना शनिदेव व त्यांच्या मातेला पुन्हा एकदा सौख्य प्राप्त करून देण्याची विनंती केली यावर सूर्य देवाने जेव्हा सूर्य मकर राशि मध्ये प्रवेश करेल तेव्हा शनिदेव व त्यांच्या मातेवरील हे विघ्न टळेल असे सांगितले होते व या दिवशी मकर संक्रांतीला उत्तरायानामध्ये प्रारंभ होऊन पुन्हा एकदा शनि देवांना चांगले दिवस आले या दिवशी शनिदेव व सूर्य देवांची आराधना करणाऱ्या व्यक्तींची साडेसाती दूर होते असेही मानले जाते.

6) आयुर्वेदामध्ये सुद्धा मकर संक्रांतीचे महत्व व्यक्त केले आहे. आहार विहाराच्या दृष्टीनेही मकर संक्रांतीला विशिष्ट महत्त्व आहे. या दिवशी तिळाचे पदार्थ व शेतामध्ये नव्याने पिकलेल्या भाज्या खिचडी यांसारखे