Home » कपाळावर कुंकू आणि टिकली लावण्याचे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक कारण…
Spiritual

कपाळावर कुंकू आणि टिकली लावण्याचे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक कारण…

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून रुढी आणि परंपरा यांचे पालन केले जाते वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथांचा आज देखील मान राखला जातो.पूर्वजांकडून आलेल्या अशा अनेक प्रथा आहे ज्याचे आज देखील पालन केले जाते त्यामधीलच एक म्हणजे कपाळावर लावले जाणारे कुंकू आणि टिकली.हिंदू धर्मामध्ये लग्न झालेल्या स्त्रीया कुंकूवाला खूप महत्त्व देतात.

लग्न झाल्यापासून त्या आपल्या पतीला परमेश्वर मानतात.पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी दररोज न चुकता नियमित कपाळावर कुंकू लावतात.हिंदू धर्मात कोणतेही शुभकार्य असो कुंकवाला खूप महत्त्व दिले जाते.सोळा शृंगारापैकी मानले जाणारे एक म्हणजे कुंकू.आजकाल प्रत्येक गोष्टी मध्ये बदल होत चालला आहे तसाच बदल यामध्ये देखील झाला आहे आता कुंकवाची जागा टिकलीने घेतली आहे परंतु टिकली लावण्याचे देखील फायदे आहेत.

प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की कपाळावर कुंकू आणि टिकली का लावत असेल तर आज आपण या मागील करण जाणून घेणार आहोत.

कुंकू लावण्यामागचे वैज्ञानिक कारण आणि आरोग्यासाठी होणारे फायदे…

१) कुंकू लावल्याने ताण दूर होतो : कुंकात मर्क्युरी म्हणजे पारा असतो.कुंकवामध्ये पाण्यासारखा धातू भरपूर प्रमाणात असल्यामुळे कुंकू लावल्याने ताण कमी होतो आणि डोकं शांत राहते.लग्नानंतर कुंकू लावण्या मागचे कारण कुंकू लावल्याने रक्त संचार सुधारतो आणि यौन क्षमता देखील वाढते.आपल्याला काही काम करायचं म्हंटल की ताण येतो आणि कपाळावर आढया पडतात तेव्हा सगळा ताण एका बिंदूवर जमा होतो त्या बिंदूला उत्तेजना देण्याचे काम कुंकू करते.

२) सौंदर्य वाढते : कुंकू लावल्याने महिलांच्या सौंदर्यामध्ये भर पडते म्हणून महिलांचे सौंदर्य खुलून दिसते.कुंकू लावण्याने चेहर्‍यावर सुरकुत्या पडत नाही.तसेच कुंकू महिलांच्या शरीरात ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.जिथे कुंकू लावतो त्या भागातील आज्ञाचक्रावर दाब पडतो त्यामुळे त्या भागातील बिंदू दाबले जातात त्यामुळे  चेहर्‍याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.

३) एकाग्रता वाढते : योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो .आज्ञा चक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करते.जेव्हा आज्ञा चक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते.आज्ञा चक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहते.डोकेदुखी कमी होते.

४) वैज्ञानिक कारण : भांगामध्ये कुंकू लावणे हि केवळ रुढी परंपरा आहे कि त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे ते जाणून घेऊया ब्रम्हरंध आणि अध्मि नावाच्या मर्मस्थावरच स्त्स्त्रिया कुंकू लावतात. त्यालाच  आपण सामान्य भाषेमध्ये भांग असे म्हणतो.पुरुषांपेक्षा स्त्रियांचा भांगातील जागा जास्त कोमल असते.

५) वाईट शक्तीपासून बचाव : असे म्हणतात कि कुंकू आणि सिंदूर लावल्याने पतीचे आयुष्य वाढते किंवा पत्नीच्या भांगातील कुंकू पाहून शत्रूशी लढण्याची सक्ती मिळते आणि उत्साह वाढतो.कुंकवामध्ये असणारे मारक तत्व स्त्रीला वाईट शक्तीपासून सरंक्षण करते असे देखील म्हंटले जाते.

टिकली लावण्याचे फायदे काय आहेत ते बघूया… 

१) टिकली लावल्यामुळे डोकेदुःखी पासून अराम मिळतो.

२) टिकली लावल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते आणि डोळे निरोगी राहतात.

३) त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

४) ताणतणाव कमी होतो तसेच थकवा देखील दूर होतो.

५) स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.