Home » पायात चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नाही तर, यामागे आहे शास्त्रीय कारण…!
Spiritual

पायात चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नाही तर, यामागे आहे शास्त्रीय कारण…!

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये मुलीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. मुलीचा जन्म संबंधित कुटुंबीयांसाठी भाग्याची गोष्ट मानली जाते म्हणूनच पहिली बेटी धनाची पेटी असे म्हटले जाते. मुलीचा जन्म होणे हे एक नशीबवान माणसाचे लक्षण मानले जाते. मात्र आजही आधुनिक काळात अनेक ठिकाणी केवळ वंशाचा दिवा म्हणून मुलाचा हव्यास धरला जातो व मुलींच्या गर्भाला या जगात येण्याअगोदरच संपवले जाते.

मुलीच्या जन्माला बद्दल काही व्यक्तींना साशंकता असते त्यांनी भारतीय प्राचीन साहित्यामध्ये सुद्धा मुलीला देवी लक्ष्मी चा अंश मानले गेले आहे हे समजून घ्यावे. ज्या घरामध्ये घरातील स्त्रिया व मुली स्वतःला शुचिर्भूत करून सोळा शृंगार करतात या घरांमधून निश्चितच लक्ष्मीचा वास असतो असे प्राचीन साहित्यामध्ये म्हटले गेले आहे कारण देवी लक्ष्मीला सोळा शृंगार करणे प्रिय होते.

लक्ष्मी सर्व सोळा शृंगार करूनच विराजमान असते. सोळा शृंगार करण्या मध्ये पायातील पैंजणाला सुद्धा महत्त्वपूर्ण स्थान आहे. पैंंजण परिधान केल्यानंतर होणारा घुंगरांचा आवाज घरामध्ये देवी लक्ष्मी सदैव राहण्यात मदत करतो असे प्राचीन साहित्यात मानले गेले आहे.

महिला किंवा मूली या प्रामुख्याने चांदीचे पैंजण परिधान करतात कारण चांदीवर चंद्राचे वर्चस्व असल्यामुळे स्त्रीयांच्या अनेक आरोग्यविषयक समस्या तर दूर होतातच मात्र या व्यतिरिक्त घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर्याही राहते असे मानले जाते. मुली या घराच्या लक्ष्मी असतात त्यांच्या येण्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि संपदा नांदते‌. जेव्हा मूलीचा विवाह होतो व ती दुसऱ्या घरामध्ये लक्ष्मी बनून जाते त्या वेळी माहेरी काही वेळा आर्थिक विवंचना निर्माण होते.

या परिस्थितीवर एक उत्तम आणि सोपा उपाय प्राचीन साहित्यामध्ये सांगितला गेला आहे. या उपायानुसार मुलीचा विवाह निश्चित झाल्यानंतर तिच्या पायांमध्ये चांदीचे पैंजण परिधान करावे व तिच्या पाठवणीच्या वेळी य चांदीच्या पैंजणांचा जोड मधील एक पैंजण काढून घेऊन ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे व दुसरे पैंजण तिला द्यावे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील संपत्ती ही कायम राहते व घरातील वातावरण सुद्धा आनंददायी राहते.