Home » क्रिकेट प्रेमींसाठी दुःखद बातमी, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू चे दुःखद निधन…!
Sports

क्रिकेट प्रेमींसाठी दुःखद बातमी, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू चे दुःखद निधन…!

महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी आज शुक्रवारी निधन झाले.मीडिया रिपोर्ट्सनुसार,वॉर्न यांना हृदयविकाराचा झटका आला होता.त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या फोटोसह ट्विट करत असे लिहिले कि,’विश्वास बसत नाही.महान फिरकीपटूंपैकी एक,फिरकीला मस्त बनवणारा सुपरस्टार शेन वॉर्न आता नाही.त्यांचे कुटुंब,मित्र,त्यांच्या चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.

महान वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी देखील शोक व्यक्त करत लिहिले,’महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनाची दु:खद बातमी आत्ताच मिळाली.मला हि बातमी एकूण किती धक्का बसला आहे आणि मी किती दुःखी आहे याचे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.शेण वॉर्न हे किती महान व्यक्तिमत्व,क्रिकेटपटू आणि माणूस होते.

शेन वॉर्नची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते.१३ सप्टेंबर १९६९ मध्ये व्हिक्टोरिया येथे जन्मलेल्या वॉर्नने आपल्या कारकिर्दीत १४५ कसोटी,१९४ एकदिवसीय सामने खेळले.त्याने कसोटीत ७०८ आणि एकदिवसीय प्रकारात २९३ विकेट्स घेतल्या आहेत.याबरोबरच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३१९ विकेट्सची नोंद आहे.