Home » भारताची स्टार महिला क्रिकेटर मिताली राज झाली ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारवर फिदा…
Sports

भारताची स्टार महिला क्रिकेटर मिताली राज झाली ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारवर फिदा…

मिताली राज सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.ती २२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाशी जोडलेली आहे.अलीकडेच तिने टीव्ही शोमध्ये आपली लग्नाची निवड सांगितली आहे.

मिताली ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसली होती…

काही काळापूर्वी मिताली राज ‘कपिल शर्मा शो’मध्ये दिसली होती.तिचे सहकारी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी हेही पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कपिल शर्माने रोचक प्रश्न विचारला…

जेव्हा कपिल शर्माने मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी यांना विचारले की तुला क्रिकेटर्सशी लग्न करायचे आहे की बॉलीवूडच्या कोणत्याही कलाकारांशी.

मितालीला या अभिनेत्याशी लग्न करायचे आहे

कपिल शर्माच्या प्रश्नाला मिताली राजने दिलखुलास उत्तर दिलं, ती म्हणाली,बॉलिवूडशी संबंधित कोणाशीही लग्न करायला माझी हरकत नाही,जो आवडत होता त्याचं लग्न झालं,मला तर अमीर खान आवडतो.

मितालीचे पहिले प्रेम क्रिकेट नाही…

मिताली राजने हिने तिच्या खेळाने स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.पण क्रिकेट हे तिचे पहिले प्रेम नव्हते.वडिलांच्या सांगण्यावरून मिताली राज क्रिकेटर बनली.तिला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच नृत्यांगना व्हायचं होतं. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतलेले आहे. 

लग्न न करण्याचे कारण…

राजस्थान मधील जोधपूर या गावी डिसेंबर १९८२ मध्ये जन्मलेल्या मिताली राजने अद्याप लग्न केलेले नाही. इतकं वय होऊनही लग्न न करण्याचं कारणही खूप खास आहे. मितालीने ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत हे गुपित सांगितले होते.ती म्हणाली, ‘खूप पूर्वी मी खूप लहान असताना हा विचार माझ्या मनात यायचा, पण आता जेव्हा मी विवाहित लोकांना पाहते तेव्हा माझ्या मनात लग्न करण्याचा विचार येत नाही.मी अविवाहित असल्याचा मला खूप आनंद आहे.

About the author

Being Maharashtrian