Home » डी-मार्ट कंपनीचे संस्थापक राधाकिशन दमानी यांची यशोगाथा…
Success

डी-मार्ट कंपनीचे संस्थापक राधाकिशन दमानी यांची यशोगाथा…

भारत एक कृषिप्रधान देश असण्याबरोबरच एक औद्योगिक महासत्ता म्हणून स्पर्धेत येण्या पर्यंतचा भारताचा प्रवास हा निश्चितच उल्लेखनीय आहे.या प्रवासामध्ये भारत सरकार प्रमाणेच भारतामधील उद्योजकांचा मोठा वाटा आहे. हे सर्व उद्योजक अगदी पिढीजात उद्योग व्यवसायात स्थिरावलेले नव्हते तर काही तर अगदीच नवखे होते. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना या क्षेत्रांमध्ये आपली बुद्धिमत्ता आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी स्वतःचा ब्रांड निर्माण केला.याची  परिणीती म्हणजे आज उद्योजकांचे नाव हे आघाडीच्या उद्योजकांमध्ये भारतीय उद्योजकांचे नाव अगदी आदराने सामील केले जाते.

या उद्योजकांचे जीवन हे येणार्‍या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे व भारतीय अर्थव्यवस्थेला पूरक आहे. भारतीय उद्योगधंद्यांमध्ये आपले मोलाचे योगदान देणाऱ्या पैकी एक उद्योजक म्हणजे राधाकिशन दमानी होय. राधाकिशन दमानी यांचे भारतीय उद्योग जगतामध्ये योगदान काय होते हे आज आपण जाणून घेणार आहोत.कठीण परिस्थितीपुढे हतबल न होऊन राधाकिशन दमानी यांनी सिंगल अपार्टमेंटमध्ये राहून व केवळ बारावी पास या शिक्षणाच्या जोरावर डी-मार्ट सारख्या मोठ्या रिटेल चेन ची स्थापना केली आहे हे पाहून निश्चितच आश्चर्य वाटेल.

राधाकिशन दमानी हे जगभरातील श्रीमंत लोकांची यादी मध्ये 98 व्या क्रमांकावर आहेत.ब्लूमबर्ग मिलेनियर इंडेक्स मध्ये राधाकिशन दमानी  यांची एकूण संपत्ती 1. 42 लाख कोटी इतकी असून सुरुवातीच्या काळात केवळ पाच हजार रुपये इतकी गुंतवणूक करणारा हा माणूस आज रिटेल किंग कसा बनला त्याची कहाणी जाणून घेणे निश्चितच उत्सुकतेचे ठरेल.राधाकिशन दमानी यांचे वडील पेशाने शेअर ब्रोकर होते.वडिलांच्या निधनानंतर राधाकिशन यांनी त्यांचा पिढीजात चालत आलेला बोअर वेलिंगचा व्यवसाय बंद केला व आपला भाऊ गोपीकिशन सोबत पूर्णपणे ते शेअर ब्रोकिंग च्या व्यवसायात उतरले.

हा काळ होता जेव्हा हर्षद मेहताने बाजारामध्ये धुमाकूळ घातला होता.हर्षद मेहता बाजारात चाललेले तेजीचा फायदा घेत होता तर राधाकिशन दमानी हे बाजारात होणाऱ्या संभाव्य घसरणीचा फायदा घेणार होते त्यांनी एकदा असे सांगितले होते की जर एक दिवस हर्षद मेहताची घोडदौड  सातत्याने चालू राहिली असती तर त्यांचा फार मोठा तोटा झाला असता.राधाकिशन दमानी यांचा जन्म 1954 साली बिकानेर येथे एका मारवाडी कुटुंबात झाला.

त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती ही सर्वसाधारण होती व ते एका सिंगल अपार्टमेंट मध्ये राहत होते.मुंबईमध्ये राधाकिशन दमानी यांनी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला मात्र काही काळातच त्यांनी हे शिक्षण सोडून दिले.राधाकिशन दमानीनी प्रत्यक्ष व्यवहारज्ञान घेण्यास सुरुवात केली.2002 साली त्यांनी डी मार्ट चे पहिले दुकान उघडले होते.2017 साली डी मार्ट ची  जनक कंपनी असलेली सिपरमार्ट ने आयपीओ मध्ये नोंदणी केली व शेअर बाजार मध्ये नोंदणी करण्यात आली.

2011-12 मध्ये डी-मार्ट चे 55 स्टोर्स होते,2012-13 मध्ये 62 स्टोर्स होते,2013-14 मध्ये 75 स्टोर्स होते,2014-15 में 89 स्टोर्स होते,2015-16 मध्ये 110 स्टोर्स होते,2016-17 मध्ये 131 स्टोर्स होते,2017-18 मध्ये 176 स्टोर्स होते,2018-19 मध्ये 214 स्टोर्स होते.  आज देशभरातील 11 राज्यांमध्ये आणि एका संघराज्यात डी मार्ट कंपनीचे 238 स्टोर्स आहेत.राधाकिशन दमानी हे नेहमी पांढ-या रंगाचे कपडे घालतात याचे कारण म्हणजे दररोज कोणते कपडे घालावे यांचा संभ्रम नसावा.राधाकिशन दमानी यांना यामुळे मिस्टर व्हाईट एंड व्हाईट असे म्हटले जाते.राधाकिशन दमानी यांनी नुकतेच 1011कोटी रूपयांध्ये  मलबार हिल येथे घर खरेदी केले.हे महागड्या घरांपैकी एक होते.