Home » ‘या’ मराठी माणसाने उभारली जगातील सर्वात उंच हॉटेल…
Success

‘या’ मराठी माणसाने उभारली जगातील सर्वात उंच हॉटेल…

अशोक कोरगावकर हे मुंबईमध्ये वरळी या चाळी मध्ये राहत असायचे.त्यांना लहानपणापासून चित्रकलेचा छंद होता. त्यांच्या चित्रांमध्ये सुध्दा बिल्डिंग असायच्या आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये निश्चय केला होता की आपण देखील एक दिवस अशीच उंच इमारत बांधायची.

मुंबईतील वरळी या चाळीमध्ये १०० फुटांच्या लहानशा खोलीमध्ये राहणारा एक मुलगा एक दिवस आर्किटेक्ट बनून जगातील सर्वात उंच पंचतारांकित हॉटेल बांधून गिनीज बुक मध्ये नाव नोंद करेल असा कोणत्याही मराठी माणसाने विचार देखील केला नसेल.

पण अशोक कोरगावकर यांनी हे करून दाखवलं.आपण आतापर्यंत इतिहास घडवणाऱ्या अनेक व्यक्तींबद्दल वाचले असेल त्या नेहमी सामान्य कुटुंबामधूनच असतात हा देखील एका प्रकारचा इतिहासच आहे.घरापासून जवळ असणाऱ्या ‘रचना संसद’ येथून त्यांनी आर्किटेक्टची पदवी घेतलेल्या कोरगावकर यांनी दुबई मध्ये जगातील सर्वात उंच हॉटेल बांधून दुबईचे वास्तू विशारद म्हणून नाव कमावले आहे.

आर्किटेक्टची पदवी घेतल्यानंतर त्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घेतला  बहारीनच्या जे.एस.डेकॉर या कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली.१९८२ मध्ये ते दुबईला गेले तिथे त्यांनी ‘अल वसी अल जाहिद’ या कंपनीमध्ये त्यांनी दहा वर्षे काम केले त्यांच्या पत्नी देखील त्याच कंपनीमध्ये होत्या.

१९९२ मध्ये त्यांनी त्यांची स्वतःची आर्च ग्रुप कन्सल्टन्सी हि कंपनी सुरु केली नंतर ५ ते ६ वर्षांमध्ये त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत ७५ वर पोहचली आणि ९ वर्षानंतर ती संख्या २५० वर आली.१९९९ मध्ये एमिरेट्स एअर लाईन्सने त्यांना ‘अल आका बीच’ रिसॉर्ट्सचे काम दिले.हाच त्यांच्या जीवनातील टर्निग पॉईंट होता.