Home » रितेश अग्रवाल वयाच्या २४ व्या वर्षी असा झाला कोट्यावधींच्या ‘ओयो रूम्स’ कंपनीचा मालक…
Success

रितेश अग्रवाल वयाच्या २४ व्या वर्षी असा झाला कोट्यावधींच्या ‘ओयो रूम्स’ कंपनीचा मालक…

एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा तुम्ही झपाटून जाता व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते स्वप्न पूर्ण करता तेव्हा जगातील कोणतीही ताकत तुम्हाला इच्छित ध्येय साध्य करण्यापासून रोखू शकत नाही.हेच सत्य रितेश अग्रवाल या तरुणांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होते.कुणी कल्पनाही करू शकत नाही की वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी रितेश ने स्थापन केलेली ओयो रूम्स ही कंपनी आज हजारो कोटींची उलाढाल करत आहे.

रितेश अग्रवाल चा जन्म 1993 सारी ओडिसा मधील बिसम या एका छोट्याशा शहरामध्ये झाला होता.रितेश जगातील सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत कमी वयाच्या अरबपतींमध्ये सुद्धा सामील आहे.रितेशच्या यशाचे व आर्थिक उलाढालीचे अंदाज यावरून लावले जाऊ शकतात जेव्हा आपल्याला कळते की वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी रितेश 7800 कोटी इतक्या संपत्तीचा मालक होता.

रितेश ने 2012 साली ओरेवल स्टेस या रूम बुक करण्याच्या कंपनीची स्थापना केली.त्याची ही कल्पना गुडगाव येथील मनीष वर्मा यांना खूपच आवडली व त्यांनी त्याच्या या कंपनीमध्ये गुंतवणूक करून ते भागीदार झाले. 2013 साली रितेशने या कंपनीचे रूपांतर ओयो रुम्स‌ कंपनीमध्ये केले.रितेश ला सुरुवातीपासूनच फिरण्याची खूप आवड होती व यातूनच त्याला एका अनोख्या बिझनेसची आयडिया सुचली.रितेश 2009 साली डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला गेला होता व त्यावेळी त्याला या गोष्टीची अगदी प्रकर्षाने जाणीव झाली की रूम बुक करणे हे खूपच अवघड काम आहे.कारण कित्येकदा खूप जास्त पैसे देऊनही‌ चांगली रूम मिळत नाही व काही वेळा कमी पैशातही अगदी उत्तम राहण्याची सोय होते.या गोष्टीला अनुसरूनच त्याने ओयो रूमस ची स्थापना केली.

रितेश ने शालेय शिक्षण हे ओडिशामधील त्याच्या जिल्ह्यातूनच पूर्ण केले व नंतर तो दिल्लीला रवाना झाला.याठिकाणी बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अकॅडमी मधून त्यांनी आपले शिक्षण सुरू केले पण नंतर त्याने मधूनच आपले शिक्षण सोडून दिले.अगदी सुरुवातीपासूनच रितेश मार्क झुकरबर्ग,स्टीव्ह जॉब्स यांना आपला आदर्श मानत आला आहे.सध्या त्याच्या यशामुळे रितेश आय आय टी  व आय आय एम या आघाडीच्या शिक्षण संस्थांमधील लोकांचे नेतृत्व करत आहे.त्याच्या मते भारतामध्ये शिक्षण मध्येच सोडून काहीतरी कल्पक करू पाहणाऱ्या व्यक्तींची भारतामध्ये कदर केली जात नाही मात्र येत्या काळामध्ये भारतातही अशा काही लोकांना यशस्वी झालेले बघायला निश्चितच मिळेल.

रितेश ने खूप  कमी वयामध्ये हे यश मिळवले आहे व आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन मधील लोकांमध्ये रितेश चांगलाच लोकप्रिय आहे.तिथे त्याला लीओ ताईशी या नावाने ओळखले जाते.रितेश ने ओयो रूमस व्यवसाय चीनमध्ये वाढविण्यासाठी तेथील सर्वात अवघड समजली जाणारी मांडरीन ही भाषा खूप कमी दिवसांमध्ये शिकून घेतली.2019 साली रितेश ने ओयो रूमस मधील आपला हिस्सा हा दोन ते तीन टक्क्यांनी वाढवला आहे.