Home » २२ व्या वर्षी IAS ऑफिसर बनलेल्या स्मिता सभरवाल यांची प्रेरणादायी कथा…!
Success

२२ व्या वर्षी IAS ऑफिसर बनलेल्या स्मिता सभरवाल यांची प्रेरणादायी कथा…!

भारत हा पितृसत्ताक पद्धती असलेला देश आहे.खूप पूर्वीपासून मुलींना तुलनात्मकदृष्ट्या शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी कमी प्रमाणात दिल्या गेले आहेत.आज सुद्धा काही भागांमध्ये मुलींना शिकण्यास व बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो.या परिस्थितीमध्ये सुद्धा सध्या महिला व स्त्री मुली वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने शिखर काबीज करत आहेत.अशाच एका प्रेरणादायी महिलेची कथा आज आपण जाणून घेणार आहोत.

त्याचे नाव आहे स्मिता सभरवाल.स्मिता सभरवाल या एक आयएएस अधिकारी असून त्यांचे हा पेशा स्वीकारणे मागचे मुख्य उद्दिष्ट हे केवळ जनतेची सेवा करणे हेच होते.भारतामधील सर्वात अवघड परीक्षा पैकी एक मानला जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मध्ये केवळ 24 तास अभ्यास करून पास होऊ शकत नाही तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या आयुष्याची उद्दिष्ट,तुमचे छंद व तुमचे रस यावर सुद्धा खूप काही अवलंबून असते असे स्मिता सबरवाल यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी स्मिता सभरवाल यांना त्यांच्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता.स्मिता सबरवाल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची संपूर्ण देशात चौथ्या क्रमांकावर परीक्षा उत्तीर्ण केली व त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयांमध्ये झाली.स्मिता सभरवाल या मूळच्या दार्जिलिंग च्या असून त्यांचे वडील हे सुद्धा अधिकारी होते.

सबरवाल यांचा जन्म दार्जिलिंग येथे 1977 साली झाला.स्मिता अग्रवाल यांचे वडील कर्नल प्रणव दास होते.वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्मिता सबरवाल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांनी आयपीएस अधिकारी अनुप सभरवाल यांच्यासोबत विवाह केला आहे.या दोघांना दोन मुले सुद्धा आहेत.त्यांना एक दशक  आंध्रप्रदेश मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. या कार्य काळामध्ये त्यांनी वरंगल, चितूर,नेल्लोर या ठिकाणी काम केले व ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले त्या ठिकाणी आपल्या कामाची एक वेगळी छाप सोडली यामुळे त्यांना जनतेचा अधिकारी असेसुद्धा म्हटले जाते. तब्बल एक दशकांनंतर त्यांना करीम नगर येथे म्हणून नियुक्ती मिळाली.

स्मिता सबरवाल यांनी आपल्या आंध्र प्रदेश येथील कार्य काळामध्ये खूप उत्कृष्ट कार्य केले. तेलंगाना येथे आरोग्य क्षेत्रामध्ये राबवलेल्या अम्मालललाना योजनेच्या भरीव कामगिरीमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांचा एक्सेलेन्सी अवॉर्ड मिळाला होता.तसेच तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत.स्मिता सबरवाल या सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असतात.तसेच समाज या प्रतीचे त्यांचे ऋण त्यांनी कधीच विसरलेले नाही.दररोज अनेक लोकांच्या समस्या त्या ऐकत असतात व आपल्या अधिकारांमध्ये त्या समस्यांचे समाधान करण्याचाही प्रयत्न त्या करतात.

स्मिता सभरवाल यांना देशातील कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांपैकी सुंदर अधिकारी म्हणून सुद्धा ओळखले जाते.त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपली स्ट्रॅटेजी सुद्धा सांगितली आहे.त्या दररोज सहा तास अभ्यास करत असत व साधारण एक ते दोन तास कोणत्याही आउटडोर गेम्स  त्या खेळत असत यामुळे मानसिक संतुलन ठीक राहण्यास मदत होते असे त्यांचे सांगणे आहे.वर्तमानपत्रे व सध्याच्या घडामोडींबद्दल जागरूक राहणे सुद्धा आवश्यक असल्याचे त्या सांगतात.