Home » पानसुपारीवाला ते हास्यसम्राट! जाणुन घ्या भाऊ कदम यांचा खडतर प्रवास…!
Success

पानसुपारीवाला ते हास्यसम्राट! जाणुन घ्या भाऊ कदम यांचा खडतर प्रवास…!

‘चला हवा येऊ द्या’ हा मराठी कार्यक्रम प्रत्येक घराघरात पोहचला आहे.या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार खास आहे म्हणून ह्या कार्यक्रमाला सर्वात जास्त पसंती मिळत आहे.तर आज आपण या शोमधील एका विनोदी कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत.ज्यांचे नाव ऐकल्या बरोबरोबरच आपल्या चेहऱ्यावर हसू येते ते म्हणजे भाऊ कदम,चला तर मंग जाणून घेऊया भाऊ यांच्या यशाच्या मागची कथा. 

भाऊ कदम यांचा जन्म १९७२ मध्ये वडाळा या गावी झाला त्यांचं पूर्ण नाव भालचंद्र पांडुरंग कदम आहे परंतु लहान पानापासून त्यांचे आईवडील त्यांना लाडाने भाऊ म्हणायचे त्यांनी कधी कल्पनाही नव्हती केली कि त्यांचा लाडका भाऊ संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका भाऊ बनेल.

त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावामधून पूर्ण केले त्यांना लहानपणा पासूनच कलेची आवड होती त्यामुळे ते शाळेतील भरपूर वेळा सहभाग घेत असत.त्यांना नेहमी वाटायचे की आपला रंग थोडा काळा असल्यामुळे आपल्याला अभिनेता होता येणार नाही आणि यादरम्यानच भाऊंच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे कुटुंबची संपूर्ण जबाबदारी भाऊंच्या खांद्यावर आली त्यामुळे त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यांनतर त्यांनी कंपनीमध्ये काम केले परंतु त्यामुळे आर्थिक गणित जुळत नव्हते त्यामुळे त्यांनी पानाची टपरी टाकली आणि तिथेच दिवसभर पण सुपारी विकत असत.काही दिवसानंतर दिग्दर्शक विजय निकम यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात परत येण्यासाठी आग्रह केला आणि मंग काय तेथूनच त्यांच्या आयुष्यात यु टर्न आला.

त्यांनी अनेक सुपर हिट नाटकांमध्ये काम केले जसे कि जाऊ तिथं खाऊ,एक डाव भटाचा.त्यानंतर झी मराठी चॅनेलवरील ‘फु बाई फु’ या मालिकेची ऑफर अली तेव्हा त्यांना वाटले कि टीव्ही मध्ये काम करायला आपल्याला जमणार नाही त्यामुळे त्यांनी या मालिकेत काम करण्यास नकार दिला होता परंतु त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांना या शो मध्ये काम करण्यास आग्रह केला आणि त्यांनी ही ऑफर स्वीकारली.

त्यानंतर २०१४ मध्ये मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी झी मराठीने चला हवा येऊ द्या हा शो सुरु केला नंतर हळूहळू सगळ्या लोकांना या शो ने वेड लावले त्यामध्ये भाऊंची भूमिका अगदी महत्वाची होती अशा प्रकारे भाऊ कदम यांचा हास्य सम्राट बनण्याचा प्रवास.