Home » ‘कुरियर बॉय ते फ्लिपकार्ट कंपनीचे असोसिएट डायरेक्टर’ अम्बूर इयाप्पा यांची प्रेरणादायी कथा…!
Success

‘कुरियर बॉय ते फ्लिपकार्ट कंपनीचे असोसिएट डायरेक्टर’ अम्बूर इयाप्पा यांची प्रेरणादायी कथा…!

ऑनलाईन खरेदी म्हटले की काही नावं अगदी प्रकर्षाने समोर येतात त्यापैकी एक म्हणजे फ्लीपकार्ट होय. फ्लीपकार्ट मधील यशाच्या कहाण्या नेहमीच प्रकाशित केल्या जातात व यामुळे परिस्थिती पुढे हतबल न होता पुन्हा एकदा उभे राहिले आहे अशा हिरोच्या कहाणी समोर येतात. ही  कहाणी आहे सध्या फ्लिपकार्टच्या असोसिएट डायरेक्टर पैकी एक असलेल्या अम्बूर इयाप्पा यांची.

मात्र कधीकाळी त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली होती. फ्लिपकार्ट मध्ये सहभागी होण्याअगोदर अम्बूर उदरनिर्वाह चालवण्यासाठी फर्स्ट फ्लाईट या कंपनीमध्ये कुरिअर बॉयचे‌ काम करत असत. आपल्या या कामांमध्ये त्यांना समाधान मिळत नव्हते म्हणून तीन महिने त्यांनी एक ब्रेक घेतला.

ब्रेकच्या काळामध्ये अन्य क्षेत्रामध्ये धडपड करण्यासाठी प्रयत्न केला. तीन महिन्यानंतर जेव्हा ते कामावर गेले तेव्हा त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. याचवेळी फ्लिपकार्ट ही कंपनी नव्यानेच स्थापन झाली होती व त्यांना आपल्या कंपनीमध्ये लॉजिस्टिक विभागामध्ये भरती करायची होती. अम्बुर इयाप्पा यांना आपल्या अगोदरच्या कंपनीमध्ये लॉजिस्टिकच्या कामाचा अनुभव होता व या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही नोकरी स्वीकारली.

या ठिकाणी त्यांना आठ हजार रुपये महिना इतके वेतन मिळत होते. त्यांनी या संधीचे सोने करत आपले काम अतिशय कौशल्याने पार पाडले. फ्लिपकार्ट ही कंपनी सध्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे व अम्बूर इयाप्पा हे  फ्लिपकार्ट चे पहिले कर्मचारी आहेत. त्यांचे या पदाचा मान ठेवत त्यांना flipkart मध्ये काही समभाग ही देण्यात आले आहेत.

सध्या अम्बुर इयाप्पा हे फ्लिपकार्ट कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टर पदावर आहेत. कुरिअर बॉय ते असोसिएट डायरेक्टर या प्रवासामध्ये अम्बूर अनेकदा हातबल झाले, आर्थिक दृष्ट्या दुर्बलता ही त्यांना वाटली मात्र या सर्व परिस्थिती पुढे खचून न जाता वेळोवेळी त्यांनी दुप्पट जिद्दीने परिस्थितीला मात दिली.