Home » भारतीयांची मान उंचावेल असं जगाला हेवा वाटणारं अमेरिकेतील भारतीय दाम्पत्य…!
Success

भारतीयांची मान उंचावेल असं जगाला हेवा वाटणारं अमेरिकेतील भारतीय दाम्पत्य…!

एक बंगला बने न्यारा हे अनेकांचे स्वप्न असते मात्र हे स्वप्न सर्वांचेच साकार होत नाही. काही व्यक्ती मात्र आपल्या कर्तृत्वाने अगदी साता समुद्रापार महाल बांधून दाखवण्याची किमया साध्य करतात. असेच एक दांपत्य म्हणजे डॉ.किरण पटेल व डॉ पल्लवी पटेल होय. या दांपत्याने अमेरिकेत फ्लोरिडा शहरात सतरा एकर जागेवर एक आलिशान महाल बांधला आहे.

या महालात ते वस्त्रांचे कुटुंब राहते. हा महाल‌ म्हणजे अमेरिकेत स्थानिक लोकांनाही थक्क करतो. पटेल दांपत्य हे फ्रिडम हेल्थचे मालक आहेत व फ्लोरिडा घ्या सामाजिक विकासात त्यांनी आर्थिक दृष्ट्या खूप मोठे योगदान‌दिले आहे यामुळे त्यांना फ्लोरिडा सरकारने सन्मानितही केले आहे. पटेल‌ दांपत्य त्यांच्या कामासोबत त्यांच्या स्वप्नवत वाटणा-या महालामुळे व राहणीमुळे सुद्धा प्रसिद्ध आहेत.

त्यांचा महाल हा ताजमहालाच्या धर्तीवर बांधला आहे. या महालाचे काम तब्बल तीन वर्षे चालू होते व २०१६ साली ते पूर्ण झाले. महालासाठी तेथील स्थानिक साहित्य वपरण्यात आले आहे. या ठिकाणी दोन विंग बांधण्यात आल्या आहेत. या विस्तीर्ण परिसरात बाग, मिनी थिएटर, दवाखाना, कॅफे या सर्व सुविधा आहेत.

या महालाची किंमत अद्याप अधिकृत पणे जाहीर केलेली नाही. या महालात आपले सर्व कुटुंब एकत्र राहावे या इच्छेने हे घर बांधल्याचे पटेल सांगतात. अशा प्रकारे भारताबाहेर राहून यशस्वी घोडदौड करणारे पटेल दांपत्य निश्चितच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.