Home » वर्षाला ४०० कोटींची उलाढाल करतो ‘हा’ शेतकरी, जाणून घ्या ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा…!
Success

वर्षाला ४०० कोटींची उलाढाल करतो ‘हा’ शेतकरी, जाणून घ्या ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा…!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात शेतकरी बांधवांना अन्नदाता म्हटले जाते मात्र निसर्गाच्या अवकृपा, सरकारी औदासिन्य यामुळे शेतकरी बांधव शेती करण्यास धजावत नाहीत. अनेकजण कर्ज बाजारी पणामुळे आ’त्म’ह’त्या करण्यास प्रवृत्त होतात. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत काहीजण आधुनिक शेती करुन आपला व कुटुंबाचा आर्थिक फायदाही करतात.

असेच एक शेतकरी म्हणजे पुण्यातील मुळशी येथील श्री ज्ञानेश्वर बोडके होय. मुळशी जिल्हा हा येथील जमिनीसाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर बोडखे हे सुध्दा आपला पिढीजात शेती व्यवसाय करत होते व जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुद्धा करत होते‌. मात्र वेळ व पैसा यांच्या गुंतवणूकीच्या मानाने उत्पन्न खूपच कमी होते म्हणून ज्ञानेश्वर बोडके यांनी काही दिवस एका ठिकाणी कामगार म्हणूनही काम केले.

या ठिकाणी दिवसभर मेहनत करूनही म्हणावे तसे प्रगती होत नाही हे त्यांना लवकरच जाणवले व पुन्हा एकदा ते आपल्या पिढीजात व्यवसायाकडे वळले. शेतीला आधुनिक पद्धतीने करता येईल हे त्यांना सांगली येथील शेतकऱ्याच्या आधुनिक शेतीतील बातमीमुळे लक्षात आले. त्यांनी कृषी व फलोत्पादन विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या हॉर्टिकल्चर व पॉलिहाऊसच्या तंत्राला शिकण्यास सुरुवात केली.

हे शिक्षण केवळलेखी स्वरूपात हे शिक्षण न घेता प्रात्यक्षिक सुद्धा घेता यावे म्हणून त्यांनी या विभागांमध्ये दररोज बारा तास नोकरीसाठी विनंती केली व त्यांची ही विनंती मान्य झाली. या ठिकाणी काम करत असताना त्यांनी शेतीच्या तंत्राचा अगदी बारकाव्याने अभ्यास केला व सुरुवातीला त्यांनी पॉलिहाऊस मध्ये फुलांची शेती केली. या फुलांच्या शेतीला पुणे परिसरातील उद्योजकांकडून चांगली मागणी आली व त्यांनी अगदी पहिल्याच वर्षात आपल्यावर असलेले दहा लाख रुपयांचे कर्ज फेडले.

यावरून त्यांना या व्यवसायात असलेल्या भविष्यातील नफ्याचा अंदाज आला. यानंतर त्यांनी समूह शेतीचा पर्याय स्वीकारण्याचे ठरवले व सुरुवातीला 15 शेतकऱ्यांना जोडीला घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केला. आता तब्बल 350 शेतकऱ्यांपर्यंत ह्या व्यवसायाची व्याप्ती आणून ठेवले आहे. या व्यवसायातील सर्व शेतकऱ्यांना वर्षाकाठी लाखो रुपये या व्यवसायातून मिळतात.

तसेच सामूहिक शेतीमुळे कुणा एकावर जोखीमही येत नाही. फुलांपाठोपाठ आता विदेशी भाज्यांच्या शेतीचे ही उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. विदेशी भाज्यांना हॉटेल व्यवसायामध्ये चांगली मागणी आहे हे ज्ञानेश्वर बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचूक ओळखले व त्या दृष्टीने त्यांनी या शेतीला सुरुवात केली.

ज्ञानेश्वर बोडके यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली समूह शेतीची व्याप्ती आता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आंध्रप्रदेश, तेलंगणा मध्ये सुद्धा झाली आहे. त्यांनी आतापर्यंत या व्यवसायामध्ये खूप यश मिळवले आहे व त्यांचे यश हे अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरू शकते.