Home » पतीच्या आ’त्म’ह’त्येनंतर हजारो कोटींचे कर्ज असतांना देखील न खचता पत्नीने असे सावरले ‘सीसीडी’…!
Success

पतीच्या आ’त्म’ह’त्येनंतर हजारो कोटींचे कर्ज असतांना देखील न खचता पत्नीने असे सावरले ‘सीसीडी’…!

मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा सारखा नसतो.प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच असते.आयुष्यामध्ये यशासोबत आपल्याला अपयशाची चव सुद्धा चाखावी लागते.समोर आलेल्या संकटांना सामोरे जाणे सगळ्यांना जमत नाही.काही व्यक्ती या समोर आलेल्या संकटामुळे हतबल होऊन आ’त्म’ह’त्ये’सारखा पर्याय निवडतात तर काही व्यक्ती या संकटां समोर अतिशय आत्मविश्वासाने उभे ठाकून त्यांना परतवून लावतात.आज आपण एका अशाच महिलेची कथा जाणून घेणार आहोत जिने दृढनिश्चय करून आपल्याला इच्छित ते ध्येय साध्य केले आहे.

या महिलेचे नाव आहे मालविका हेगडे.मालविका हेगडे या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या कन्या आहेत व त्यांचे लग्न एका अतिशय यशस्वी व श्रीमंत उद्योजकासोबत झाले होते.सर्व काही सुरळीत चालू होते मात्र अशातच चक्र पालटले होते व त्यांना क्षणार्धात जमिनीवर यावे लागले.मात्र या परिस्थितीतही त्यांनी खचून न जाता आलेल्या संकटाचा सामना मोठ्या निश्चयाने केला.

देशातील प्रसिद्ध कॉफी चेन असलेले कॅफे कॉफी डे अर्थात सीसीडी हे आबालवृद्धांसह सर्वांचे अगदी आवडते ठिकाण आहे. आजच्या तरुणाईला तर सीसीडीची खूपच क्रेझ आहे.एखाद्या मित्राच्या वाढदिवस असो किंवा पहिली डेट,पहिला पगार असो किंवा असाच टाईमपास करायचा असो सर्वांचेच आवडते ठिकाण म्हणजे सीसीडी होय.सीसीडी ही चेन भारतातील सर्वात यशस्वी मानली जात होती.

मात्र 2019 साली सर्वांनाच धक्का बसला जेव्हा कॅफे कॉफी डे चे संस्थापक असलेल्या विजी सिद्धार्थ यांनी आ’त्म’ह’त्या केली.विजी सिद्धार्थ यांनी बेंगलोरु जवळील नेत्रवती नदी पुलावरून नदीमध्ये उडी घेऊन आ’त्म’ह’त्या केली.तब्बल 36तासांच्या शोधकार्य नंतर नेत्रावती नदी च्या किनार्‍यालगत वीजी सिद्धार्थ यांचे पार्थिव सापडले होते. विजी सिद्धार्थ यांनी आ’त्म’ह’त्या करण्यामागे त्यांच्यावर झालेले प्रचंड कर्ज हे कारण असल्याचे समोर आले.

वीजी सिद्धार्थ यांच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर व कंपनीवर झालेल्या प्रचंड कर्जामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांना सुद्धा सीसीडीचे भवितव्य अंधारातच दिसू लागले.पतीच्या अकाली मृ’त्यू’नंतर व कंपनीवर झालेल्या सात हजार कोटी रुपये कर्जामुळे सुरुवातीला तर मालविका अगदी खचून गेल्या व काय करावे हे त्यांना सुचत नव्हते.एकीकडे कंपनीवर असलेले प्रचंड कर्ज फेडण्याचा प्रश्न तर दुसरीकडे कंपनी बंद पडली तर हजारो कर्मचाऱ्यांचा रोजगार जाण्याची टांगती तलवार त्यांना समोर दिसत होते.

इकॉनॉमिक टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मालविका यांनी सांगितले की अशावेळी खचून जाणे म्हणजे समोर दोनच पर्याय होते ते म्हणजे एकतर निरव मोदी किंवा विजय माल्या यांच्या प्रमाणे सर्व कर्ज बुडवून पळून जाणे होय किंवा या अंधारामध्ये उडी घेऊन आशेचा किरण शोधने होय.मात्र असे भित्र्या सारखे वागणे मालविका ना पसंत नव्हते व म्हणूनच कंपनी बंद न करण्याचे त्यांनी ठरवले व पतीचे कर्जही फेडण्याचे निश्चित केले.

आपल्या पतीचे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे होते.यासाठी सीबीडी मधील सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करण्याचे ठरवले व त्यांचा आत्मविश्‍वास पाहून बँकेने सुद्धा त्यांना कर्ज फेडण्यासाठी संधी देण्याचे ठरवले.आज घडीला पुन्हा एकदा पूर्वीच्याच दिमाखात सीसीडी उभे आहे व आतापर्यंत कंपनीवरील निम्मे कर्ज फेडले गेले आहे व येत्या काही वर्षात कंपनीवर असलेले सर्व कर्ज फेडले जाईल अशी आशा मालविका यांनी व्यक्त केली आहे.

पतीच्या निधनानंतर मालविका यांनी ज्या धडाडीने सीसीडी चा कारभार सांभाळला त्यामुळे पुन्हा एकदा हे देशातील यशस्वी ब्रँड पैकी एक म्हणून समोर येत आहे.सध्या देशातील 165 शहरांमध्ये सीसीडी च्या 572 ब्रांचेस आहेत व 36 हजार 326 कॉफी वेंडिंग मशीन सह सीसीडी हा देशातील सर्वात मोठा कॉफी उद्योगाची साखळी मानली जाते.मालविका इथून पुढच्या काळामध्ये सीसीडी च्या सीईओ म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.मालविका यांची ही प्रेरणादायी कहाणी निश्चितच अनेक महिलांना आदर्श ठरू शकते.