Home » ‘सफाई कामगार ते वरिष्ठ बँक अधिकारी’ प्रतिक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास…!
Success

‘सफाई कामगार ते वरिष्ठ बँक अधिकारी’ प्रतिक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास…!

येणा-या पिढ्यांना सामान्य माणसातील हिरोईनची किंवा रोल मॉडेलची खरी आवश्यकता आहे.अशाच एक आदर्श म्हणजे प्रतिक्षा तोंडवळकर होय. एक सफाई कर्मचारी ते बॅंकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करताना त्यांचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे. प्रतिक्षा तोंडवळकर या मूळच्या पुण्यातल्या. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह सदाशिव कडू यांच्या सोबत झाला.

सदाशिव हे स्टेट बँक मध्ये बुक बाइंडर म्हणून काम करत होते. विवाहानंतर प्रतिक्षा यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. विवाहानंतर त्यांना एक मुलगा झाला व त्या पूर्णपणे संसारात अडकून गेल्या. नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळे होते. प्रतिक्षा यांच्या पतीचे अपघाती नि’ध’न झाले व एक लहान मुलगा पदरात घेऊन त्यांचा संघर्ष सुरु झाला.

पतीच्या वेतनविषयक कामांसाठी प्रतिक्षा बॅंकेत जात असत. याठिकाणी त्यांनी मुलाच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली जावे यासाठी काम मागितले. त्यांचे शिक्षण अर्धवट असल्याने त्यांना बॅंकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवेत रुजू करण्यात आले. अतिशय हालाखीच्या परिस्थिती मध्ये प्रतिक्षा आपल्या मुलाचा सांभाळ करत होत्या. त्यांनी केवळ सफाई कर्मचारी म्हणून सेवेत समाधान न मानता अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले.यामध्ये त्यांना बॅंकेतील सहका-यांनीही साथ दिली.

त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली.आपले काम त्या अतिशय चोखपणे व कर्तबगारीने पार पाडतात. आज त्या बॅंकेत असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. मधल्या काळात त्यांनी दुसरा विवाह केला व सध्या आपल्या कौटुंबिक जीवनातही त्या समाधानी आहेत