Home » १५० रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीने कसा उभा केला करोडोंचा डोसा बिसनेस, जाणून घ्या …!
Success

१५० रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीने कसा उभा केला करोडोंचा डोसा बिसनेस, जाणून घ्या …!

दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद व मेहनत या त्रीसुत्रीच्या आधारावर‌ कोणतीही व्यक्ती फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊ शकते. भांडवलाची कमतरता, शिक्षणचा अभाव इत्यादी समस्यांवर मात करत डोसा किंग म्हणून ओळख मिळवणा-या प्रेम गणपती यांचा प्रवासही असाच आहे.

तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात प्रेम गणपती यांचा जन्म झाला. सुरुवातीपासून प्रेम गणपती यांनी कुटुंबाला हातभार म्हणून र ती काम करणे चालू केले. मुंबईत हजार रूपये महिना‌ पगाराची नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक झाली व ते मुंबईत दाखल झाले. या फसवणूकीमुळे खचून न जाता त्यांनी एका बेकरीत भांडी घासायचे काम दिडशे रुपये पगारावर सुरू केले.

या कामासोबत त्यांनी अन्यही कामे सुरु केली व बचत करत वाशी स्टेशन समोर इडली,डोसा,वडा यांचा हातगाडी स्टॉल सुरू केला, अल्पावधीतच त्यांच्या या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. गावाकडून त्यांच्या भावांना बोलावून हे तिघे मिळून दाक्षिणात्य पदार्थ ग्राहकांना खिलवू लागले.

महानगरपालिकेकडून‌ वारंवार त्यांचा गाडा उचलला जात असे यवर‌ कायमस्वरुपी पर्याय म्हणून प्रेम गणपती यांनी प्रेमसागर‌डोसा हे रेस्टॉरंट सुरू केले.१९९६ साली है रेस्टॉरंट सुरू केले व वर्षभरात या रेस्टॉरंट मध्ये डोश्याच्या १०६ पाककृती होत्या.

प्रेम गणपती यांना आपला हा व्यवसाय मॉलमध्ये न्यायचा होता.त्यांची ही इच्छा सुद्धा पुर्ण झाली.ठाण्याच्या वंडर मॉलमध्ये प्रेम सागर डोसा प्लाझा चे पहिले आउटलेट निघाले. यानंतर परदेशातही या डोसा प्लाझा चे आउटलेट सुरु झाले. या उद्योगाची वार्षिक उलाढाल कोटींच्या घरात आहे.