Home » अभिमानास्पद… शुन्यातून विश्व निर्माण करणारा मराठमोळा उद्योजक ‘शरद तांदळे’ यांचा इंग्लडच्या राजाकडून सत्कार, जाणून घ्या संघर्षमय प्रवासची कहाणी…
Success

अभिमानास्पद… शुन्यातून विश्व निर्माण करणारा मराठमोळा उद्योजक ‘शरद तांदळे’ यांचा इंग्लडच्या राजाकडून सत्कार, जाणून घ्या संघर्षमय प्रवासची कहाणी…

आपण आज एका यशस्वी उद्योजकाची प्रेरणादायी कथा जाणुन घेणार आहोत.तुम्ही शरद तांदळे यांचे नाव ऐकून असतालच.शरद तांदळे हे केव्हा पण चर्चेत असतात.चला तर मग जाणुन घेऊया नेमके आहे तरी कोण हे शरद तांदळे? शरद तांदळे हे बीड जिल्ह्यातील वंजारवाडी या गावातील आहे.वंजारवाडी हे गाव अतिशय छोटेसे आहे.खर म्हंटल तर मराठवाडा हे आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मा’गा’स’ले’ले होते.वंजारवाडी हे गाव त्यांच्या वडिलांनी शिक्षक होण्यासाठी सोडले.शिक्षण झाल्यावर ते वंजारवाडीहून बीडला गेले.

शरद तांदळे यांचे आई आणि वडील हे दोघेही जिल्हा परिषद मध्ये शिक्षक होते.त्यांचे लहानपणी चे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले.शिक्षकाचा मुलगा म्हणून शरद तांदळे यांची ओळख निर्माण झाली.पुढचे शिक्षण त्यांनी माध्यमिक शाळेत पूर्ण केले.

१० वी नंतर त्यांनी सायन्स ला ऍडमिशन घेतले परंतु त्यांना परंतु त्यांना सायन्स हा विषय अजिबात आवडत नव्हता.परंतु म्हणतात ना की जो विद्यार्थी सायन्स ला ऍडमिशन घेतो तो खुप हुशार असतो.म्हणुन त्यांनीही सर्वाना बघुन सायन्स ला ऍडमिशन घेतात.बारावी पूर्ण झाल्यावर आता समोर खुप मोठा प्रश्न होता की समोर काय करायच? 

त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की औरंगाबादला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे.मराठवाड्यातील मुलांचे औरंगाबाद हेच पाहिले कॉलेज शरद तांदळे यांनी देखील इथेच ऍडमिशन घेतले.त्यांनी इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले.त्यांना माहीत होते की आपण ठरवले तर कहीही करू शकतो शरद तांदळे यांनी’ विजययोग’ नावाचे मॅगझीन काढले.त्यांना मुलांना नोकरीला लावायचे होते.त्यानंतर शरद तांदळे यांना सर्वजण शरद भाऊ म्हणुन ओळखु लागले.

मराठवाड्यातून स्वप्न पूर्ण करायला आलेल्या मुलांसाठी शरद तांदळे हिरो बनले होते.त्या मॅगझीनमध्ये ते नोकऱ्यांच्या विषय मांडत होते.परंतु शरद भाऊच्या नादामध्ये कालांतराने प्रत्येकाचे जसे होते तसेच शरद तांदळेचे झाले.

त्यांनी इंजिनिअरिंग नंतर सॅप कोर्स करायचा निर्णय घेतला. कोणताही कोर्स करायचा म्हंटल की पैसे लागणारच.तेव्हा त्यांच्या आईने दागिने गहाण  ठेऊन त्यांना पैसे दिले त्यांच्या आईला वाटले पोरगं काहीतरी करेल.

असा विश्वास प्रत्येकाच्या आईवडिलांना असतो.दागिने गहाण ठेऊन मिळालेले ७५ हजार रुपये यांनी खर्च केले.हैद्राबादला जाण्याअगोदर ते औरंगाबाद ला मित्रांसोबत थांबले तेथेच सगळे पैसे खर्च झाले.कोर्स तर करायचा होता. कोर्स केला तरच जॉब मिळणार होता.मंग त्यांनी मित्राकडून १८ हजार रुपये घेतले.ते पैसे घेऊन हैद्राबादला गेले कोर्स पूर्ण केला. आता मराठवाड्यातील प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की ते म्हणजे पुण्याला येण्याचे.तसेच शरद तांदळे देखील पुण्यात आले.

आपण खुप चांगला कोर्स केला या भ्रमात त्यांनी खुप ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन बघितले परंतु करण्यासारखं तर काहीच मिळालं नाही पण त्यांना कोणी दारातही उभा नाही केलं.तेव्हा त्यांच्या एका इंजिनिअर मित्राने त्यांना विचारले ट्रान्सफॉर्मरच काम आलं करशील का? तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला.त्यांनी ते काम पूर्ण केले.त्यांना वाटले आता आपल्याला कंत्राटदाराचे काम जमेल.त्यांनी ते काम करायला सुरुवात केली.

याच दरम्यान त्यांना एकामागुन एक काम मिळत गेले.तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,जशी युपीएससी,एमपीएससी करुन स्वप्न पाहणारी जशी पिढी आहे तशीच मुकादम होऊन देखील जे हातात येईल ते काम करणारी देखील एक पिढी आहे.मग त्यांनी तीन वर्षांमध्ये १७५ मुलांना एकत्र आणले ती सगळी मुले कॉन्ट्रॅक्टर होती. ती मुले वाटेल ते काम करत असत.आता शरद तांदळे ला बिझनेस मॅन होण्याचा किडा चावला होता.

परंतु त्यांनी पहिल्या पासुन ठरवले होते की आपण एकट्यानेच मोठे नाही व्हायचे तर सगळ्यांना सोबत घेऊन लढायचे. त्यांनी ‘इंडियाना’ या नावाची ‘सॉफ्टवेअर कंपनी’ सुरु केली तरुण उद्योजकांसाठी संपूर्ण भारतामध्ये गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे टेंडर दाखवणारे ‘ई-टेंडर-वर्ल्ड’ नावाचे ‘टेंडरिंग सोल्युशन’ अँप बनवले.

नंतर समोर त्यांनी ‘हाऊ टू बिकम कॉन्ट्रॅक्टर’ नावाचा कोर्स सुरू केला.त्यामध्ये गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट कसे घ्यायचे ,काम कसे करायचे हे शिकवायला सुरू केले. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे राजकीय संबंध निर्माण करुन गॉड बोलून पैसे चारनं हे गणित त्यांनी सोडून काढले.मला जमलं तुम्हालाही जमु शकतं असे म्हणुन त्यांनी नवीन कॉन्ट्रॅक्टर मुलांचे जाळे विणण्यास सुरुवात केली.काही वर्षात त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर १५० हून अधिक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले.त्यानंतर त्यांना २०१३ साली लंडनमध्ये ‘यंग आंत्रप्रेन्युअर’ अवॉर्ड देखील मिळाला.

हळूहळू स्वतःची कंपनी म्हणुन प्रवास सुरु झाला.बघता-बघता कंपनी कोटींची उलाढाल करु लागली.शरद तांदळे यांचाप्रवास नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

About the author

Being Maharashtrian