Home » आजच्या तरुणाईला लाजवेल अशी गोष्ट! कधीही शाळेत न गेलेल्या या आज्जी कमावतात महिन्याला लाखो रुपये…!
Success

आजच्या तरुणाईला लाजवेल अशी गोष्ट! कधीही शाळेत न गेलेल्या या आज्जी कमावतात महिन्याला लाखो रुपये…!

आयुष्य जगत असतांना त्याला यशाची जोड मिळाली की आयुष्य सार्थ झाल्यासारखे वाटते.खर म्हंटल तर सुरुवात कशीही असो,मात्र शेवट यशस्वी च झाला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जिथे मेहनत,इच्छा असते यश देखील त्यांच्याच हाती येते.हीच वास्तविकता आहे.

याच इच्छाशक्तीच्या बळावर कधीही शाळेत न गेलेल्या आज्जी ने आपल्या स्वतः मधील गुणांना ओळखून स्वतःच्या बळावर आज महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.या आज्जीने सगळ्यांसमोर एक आदर्श मांडला आहे त्यांनी दाखवून दिले की माणूस वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नव्याने शिकू शकतो.चला तर मंग जाणुन घेऊया आज्जीच्या यशाबद्दल…

ध्येयवेड्या असलेल्या या आज्जीचे नाव सुमन धामणे आहे. यांनी सहज यूट्यूब सुरु केले आणि त्यावर व्हिडीओ बनवायला सुरु केले.स्वतः ह्या आज्जी वेगवेगळ्या पदार्थाची रेसिपी बनवायच्या आणि आणि त्यांच्या चवदार पदार्थाने आणि भाषेने संपूर्ण महाराष्ट्राला चव लावली.

आज्जी ने बनवलेल्या पदार्थांची व्हिडीओ लोक आवडीने बघायला लागली.त्यानंतर त्यांनी स्वतः बनवलेले मसाले देखील विकायला सुरुवात केली. या मसाल्याना विदेशातुन देखील खुप मागणी आहे.सुमन धामणे ह्या सारोळा कासार या गावच्या आहेत हे गाव अहमदनगर पासुन१० किमी अंतरावर आहे.त्यांनी त्यांच्या चॅनेलवर अशी बरीचशी व्हिडीओ टाकलेली आहेत.

लॉकडाऊन मध्ये त्यांचे चॅनेल जास्त चर्चेत आले होते.आणि त्याचकाळात त्यांचे स्बस्क्रायबर पण खूप वाढले.त्यांचे हे चॅनेल त्यांच्या नातू यश याने आठवीत असताना बनवले होते.गावाकडे राहणाऱ्या या आजींना सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर बोलायला खूप भीती वाटत असे.लोकांच्या प्रतिक्रियेमुळे हळू हळू त्यांची भीती कमी झाली.

आज्जीच्या चॅनेलवर पहिल्या महिन्यांमध्येच १ लाख स्बस्क्रायबर झाले.त्या आता महिन्याला १-२ लाख रुपये कमवत आहे.त्यांच्या जेवणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्या गावरान पद्धतीने आणि स्वतः बनवलेल्या मसाल्याचा वापर करून स्वयंपाक करतात.

त्यांना व्हिडीओ बनवण्याची आयडिया त्यांच्या नातवाने दिली.त्याने त्यांना पावभाजी बनवायला सांगितली तर त्या म्हणे येत नाही मंग त्याने त्यांना यूट्यूबवर व्हिडीओ दाखवला जो व्हिडीओ बघून आज्जीने खुप टेस्टी पावभाजी बनवली.या कल्पनेमुळे त्यांच्या आयुष्यात चॅनेल चा जन्म झाला.

चॅनेल सुरु केले आणि पहिला व्हिडिओ कारल्याच्या भाजीचा टाकला सुरुवात कडू कारल्यापासून जरी झाली असली तरी चॅनेल सुरु करण्याचा निर्णय गोड ठरला.चॅनेल्सवर आज ११ लाख स्बस्क्रायबर आहेत.आजी आता सतत चॅनेल वर व्हिडीओ टाकत असतात.

आजींना यूट्यूबकडून गोल्डन प्ले बटन देखील मिळाले आहे.नातू आणि आजी यांच्या इच्छा शक्तीने संपूर्ण महाराष्ट्राला गावरान जेवणाची चव मिळाली. यश मिळते पण फक्त इच्छा,जिद्द आणि सय्यम पाहिजे.यश मिळवण्यासाठी वय नाही तर यशाला फक्त आपलं सर्वस्वी समर्पण लागतं.