Home » ‘या’ मंदिरात प्रसाद म्हणून दिली जाती चक्क चिकन बिर्याणी आणि फिश करी…!
Travel

‘या’ मंदिरात प्रसाद म्हणून दिली जाती चक्क चिकन बिर्याणी आणि फिश करी…!

मित्र हा असा देश आहे जिथे बहुतांश व्यक्ती या कोणत्या ना कोणत्या तरी देवावर श्रद्धा ठेवून असतात. या भक्तांकडून देवाला विविध प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात व मंदिरांमध्ये ही भक्तांना देवाचा प्रसाद म्हणून विशिष्ट प्रकारचे अन्न दिले जाते.भारत हा अठरापगड जातींचा व विविध प्रांतांचा देश आहे. भारतामध्ये अगदी काही किलोमीटर अंतरावर पद्धती व चालीरीतीं मध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो.

मंदिरातील प्रसाद हा शुद्धतेचे व पावित्र्याचे प्रतीक मानला जातो. बहुतेक मंदिरांमध्ये हा प्रसाद शाकाहारी असतो मात्र हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतामधील काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये मांसाहार  रूपात प्रसाद दिला जातो व हा प्रसाद खूप प्रसिद्ध सुद्धा आहे. आज आपण अशीच काही मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये प्रसाद म्हणून मटन बिर्याणी किंवा मासे दिले जातात.

1) मुनियादी मंदीर, तमिळनाडू -तमिळनाडूमधील वेदपक्कम गावाजवळील छोट्या खेड्यात हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये मुनियादी स्वामी किंवा मुनेश्वर यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुनीश्वर हे शंकराचा अवतार मानले जातात. या मंदिरामध्ये दरवर्षी तीन दिवसांचा एक उत्सव साजरा केला जातो व या उत्सवामध्ये प्रसाद म्हणून मटन, चिकन बिर्याणी चा प्रसाद दिला जातो.

2) विमला मंदिर ओरिसा हे जगन्नाथ पुरी मंदिराच्या प्रांगणामध्ये वसलेले आहे. या मंदिरातील दैवत हे मा दुर्गेचा अवतार आहे व शक्ती पिठांपैकी एक मानले जाते. विमला मंदिरामध्ये दुर्गा पूजेच्या वेळी देवीला नैवेद्य म्हणून जगन्नाथ पुरी मंदिराच्या प्रांगणातील पवित्र मार्कंडा तलावातील मासे‌करिचा नैवेद्य दाखवला जातो. देवीला बोकडाची आहुती सुद्धा दिली जाते व हे मटण शिजवून याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो या दोन्हीही प्रसादांना जे भक्त संपूर्ण विधीच्या वेळी हजर असतात त्यांना दिले जाते. हे सर्व विधी जगन्नाथ पुरी मंदिराचे मुख्य द्वार उघडण्या अगोदर केले जातात.

3) तरकुल्हा देवी मंदिर, उत्तर प्रदेश -भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे मंदिर ओळखले जाते. या ठिकाणी नवस बोलल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाली तर देवीला बकऱ्याचे मटण अर्पण करण्याची पद्धत आहे. भक्त या ठिकाणी हे मटन पुजा-याना देतात व ते मातीच्या भांड्यांमध्ये शिजवून देवीला अर्पण केले जाते.

4) काली घाट, पश्चिम बंगाल -देशातील 51 शक्तीपीठांपैकी एक असलेले कालीघाट हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. बहुतांश वेळा या मंदिरात बकऱ्याचे मटण देवीला प्रसाद म्हणून अर्पण केले जाते व भक्तांमध्ये वाटले जाते.

5) कामाख्या मंदिर हे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी तांत्रिक पूजाअर्चा केली जाते व या ठिकाणी देवीला दोन प्रकारचे नैवेद्य तयार पण केले जातात. शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे नैवेद्य या ठिकाणी तयार केले जातात व वैशिष्ट्य असे की या दोन्हीही नैवद्यामध्ये कांदा व लसूण निषिद्ध मानले जाते. बहुतांश वेळा मांसाहारी नैवेद्य म्हणून देवीला माशांची चटणी बनवून अर्पण करतात. हा नैवेद्य देवीला दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान दाखवला जातो व या नैवेद्य अर्पण करण्याच्या वेळी मंदिराचे दार बंद ठेवली जातात. कामाख्या मंदिर हे शक्ती पिठांपैकी एक मुख्य पीठ आहे व हे निलाचल पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.

6) तारापीठ पश्चिम बंगाल- पश्चिम बंगाल मध्ये अजून एक शक्तिपीठ वसलेले आहे जे बीरभूम येथे आहे. या ठिकाणी देवीला मटणाच्या नैवेद्यासोबतच मद्य सुद्धा अर्पण केले जाते व हा सर्व प्रसाद येथे उपस्थित भक्तांमध्ये वाटला जातो.