Home » हे घडले नसते तर ऐश्वर्या नव्हे तर करिष्मा बनली असती बच्चन कुटुंबियांची सुन…
Uncategorized

हे घडले नसते तर ऐश्वर्या नव्हे तर करिष्मा बनली असती बच्चन कुटुंबियांची सुन…

अभिनेता अभिषेक बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी एकेकाळी खूपच चर्चा रंगली होती.बिग बी अमिताभ बच्चन यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त बच्चन आणि कपूर कुटुंबीयांकडून या दोघांच्या लग्नाची घोषणा करण्यात आली होती.यामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये खूपच उत्साह संचारला होता.मात्र लवकरच या आनंदावर विरजण पडले ते या बातमीने की करिश्मा आणि अभिषेक या दोघांचा विवाह होणार नाही.करिष्मा आणि अभिषेक चा विवाह मोडण्या मागे नक्की काय कारण आहे याबद्दल दोन्ही कुटुंबीयांनी मौन बाळगणेच पसंत केले होते.या दोघांचा विवाह मोडण्यामागे विविध प्रकारची कारणे प्रसारमाध्यमांनी मांडली.

यापैकी एक कारण असे होते की करिश्मा कपूरची आई बबिता कपूर ने हा विवाह होण्यासाठी काही अशा अटी मांडल्या होत्या ज्या बच्चन कुटुंबियांनी कधीही मान्य केले नाही व परिणामी या दोन कुटुंबांमध्ये मतभेद निर्माण होऊन हा विवाह मोडला.असे म्हटले जाते की बबिता कपूर ला आपली मुलगी करिष्मा ही आर्थिक दृष्ट्या नेहमीच वरचढ असावी असे वाटत होते व या दृष्टीने तिने बच्चन कुटुंबियांना त्यांच्या मालमत्ते मधील मोठा हिस्सा अभिषेक च्या नावावर करून देण्याची अट घातली होती जेणेकरून पुढे जाऊन करिश्माला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागू नये.

मात्र बच्चन कुटुंबियांनी या गोष्टीला नकार दिला होता.त्यावेळी करिष्मा ही एक आघाडीची अभिनेत्री होती मात्र जया बच्चन यांना करिश्माने विवाहानंतर चित्रपटांमध्ये काम करू नये असे वाटत होते.ही अट करिश्माला मान्य नव्हती.अशा प्रकारे विविध कारणांमुळे हे लग्न शेवटी मोडले.काही काळानंतर नंतर अभिषेक बच्चन ने ऐश्वर्या राय सोबत विवाह केला.