Home » अपचनाच्या समस्येवर करा या घरगुती ‘६’ उपायांनी मात…
Uncategorized

अपचनाच्या समस्येवर करा या घरगुती ‘६’ उपायांनी मात…

सध्याची व्यस्त जीवनशैली आणि जंक फूड  खाण्याचे वाढते प्रमाण यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्यांनी सर्वांनाच त्रस्त केले आहे.आरोग्यविषयक समस्यांपैकी पोटाच्या समस्या या खूप मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटा मध्ये दिसून येतात.अपचन,गॅस,पोटदुखी,बद्धकोष्टता या समस्या पोटाशी निगडित आहेत. पोटाशी निगडित या समस्या दूर करण्यासाठी बाजारामध्ये अनेक औषधे उपलब्ध आहेत किंवा आयुर्वेदिक चूर्ण सुद्धा घेतले जाते.

पोटाला साफ करणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे असते.पोटाला साफ करण्यामुळे वजन नियंत्रणात आणणे ,मूड चांगला ठेवणे,मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवणे यांसारखे फायदे होतात .पोटाशी निगडित समस्यांना दूर करण्यासाठी व पोट साफ होण्यासाठी काही घरगुती उपाय सुद्धा केले जातात.आज आपण अशाच काही घरगुती उपायांना जाणून घेणार आहोत.

१) पुदिना-पुदिना हा अपचन व बद्धकोष्ठतेवर फारच उत्कृष्ट असा उपाय आहे. पुदिन्याच्या सेवनामुळे पोट साफ होते. पुदिना हा गरम पाण्यामध्ये उकळून याचा काढा किंवा चहा घेतला तरीही फायदेशीर ठरू शकते.पुदिना आहारात समाविष्ट करणे हे पोट साफ होण्यासाठी उपयुक्त ठरते.

२) आले आणि जीरा यांची पावडर एकत्र मिसळून हे मिश्रण दिवसातून एकदा सेवन केले तरीसुद्धा पोटाला आराम मिळतो. अपचना सारखी समस्या उद्भवली तर अशावेळी या मिश्रणाचे सेवन केले तर पोट साफ होण्यास मदत होते.

३) भरपूर प्रमाणात पाणी पिणे हे सुद्धा पोट आणि आतड्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. दिवसभरात किमान सहा ते आठ ग्लास पाणी पिणे हे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप आवश्यक असते. पाणी पिण्यासोबतच ज्या भाज्या आणि फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो अशा फळे व भाज्यांचा समावेश आपल्या आहारात आवश्यक करावा. टोमॅटो आणि कलिंगड हे आपल्या आहारात प्राधान्याने असावेत.

४) पचनासाठी सैंधव मीठ खूपच उपयुक्त ठरते. पाण्यामध्ये सैंधव मीठ मिसळून हे पाणी अनशापोटी सकाळी घेतले असता पोटाचे पचनाचे कार्य हे अतिशय  सज्ञजपणे होते.हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घेतले तरी चालते.

५) तंतूजन्य पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश केल्यामुळे बद्धकोष्ठते सारख्या समस्या पासून आराम मिळतो.तंतुमय पदार्थ योग्य प्रमाणात आहारात घेतल्यामुळे मलविसर्र्जनाची प्रक्रिया नियंत्रण राखता येते.

६) सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये चमचाभर मध आणि चिमूटभर मीठ मिसळून हे पाणी घेतले असता पोट साफ होते.