Home » ओव्याच्या पानाचे ‘हे’ आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहित आहे का?
Uncategorized

ओव्याच्या पानाचे ‘हे’ आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहित आहे का?

ओवा हे अनेक भारतीय व्यंजनांमध्ये वापरला जाणारा आणि औषधी गुणधर्म असलेला पदार्थ मानला जातो.ओव्यामुळे कोणत्याही पदार्थाच्या चवीमध्ये तर भर पडतेच पण त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते.ओव्याचे अनेक प्रकारांनी वापर केला जाऊ शकतो.ओव्याच्या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा कोणत्या न कोणत्या कारणासाठी उपयुक्त ठरतो.ओव्याच्या भागांचा वापर करून विविध प्रकारची औषधे आणि काढा बनवला जाऊ शकतो.

ओव्याला संस्कृतमध्ये उग्र  समजले जाते ते त्याच्या तीव्र वासामुळे.ओव्याच्या पानांचा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय होतो. ओव्याची पाने खाल्ली असता पोट दुखीवर त्वरित आराम मिळतो.म्हणूनच अनेक महिला ज्यांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो त्यांना कच्च्या किंवा भाजलेल्या ओव्याचे सेवन करण्यास सांगितले जाते.आज आपण ओव्याच्या पानांचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत.

१) ओव्याच्या पानांचा मुख्य उपयोग पोट दुखी पासून आराम मिळवण्यासाठी होतो.ओव्याच्या पानां मध्ये अल्कोहोल सदृश घटक अगदी थोड्या प्रमाणात असतात.त्यामुळे जर ओव्याच्या पानांना कोमट पाणी आणि मिठा सोबत घेतले तर अगदी जादू प्रमाणे पोट दुखी पासून आराम मिळतो.पोट दुखी आणि ज्या व्यक्तींना अपचन यासारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करणे खूपच लाभदायक ठरते.

२) ज्या व्यक्तींना अस्थमासारखा त्रास आहे त्यांच्यासाठी ओव्याची पाने व ओवा जणू काही वरदानच ठरते.ओव्याच्या पानांचा धूर घेणेही अस्थमाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते.जर तुम्हाला असा ओव्याच्या पानांचा धूर घेणे अवघड वाटत असेल तर ओव्याच्या पानांची पेस्ट करून थोड्याशा गुळासोबत याचे दिवसातून दोनदा सेवन करावे त्यामुळे अस्थमाच्या त्रासापासून आराम मिळतो.

३) ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी आणि कफचा त्रास होत असेल त्यांनी भाजलेल्या ओव्याचे सेवन हे दररोज करावे.हा उपाय जर पंधरा दिवसांपर्यंत केला तर निश्चितच सातत्याने होणारे सर्दी आणि कफ पासून सुटका मिळू शकते.ओव्याच्या पानांचा वास घेऊन कफ सोबतच डोकेदुखी,सर्दी यांपासून नही आराम मिळतो.

४) काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की ओव्याच्या पानांचा उपयोग मधुमेहावर सुद्धा केला जाऊ शकतो.यासाठी साधारण एक टेबलस्पून ओव्याची पाने,तीन ते चार चमचे बेलाच्या पानांचा ज्यूस सोबत बारीक करून हे ज्युस पिले असता नक्कीच फरक पडतो.

५) वजन कमी करण्या मध्ये सुद्धा ओव्याच्या पानांचे खूप मोठे साहाय्य मिळते.ओव्याच्या पानां मुळे आपली चयापचयाची प्रक्रियाही खूप जलद गतीने घडून येते व मलाविसर्जनास सहाय्य मिळते.चयापचयाची प्रक्रिया प्रभावीपणे पार पडल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच वजन वाढणे असही प्रतिबंध केला जातो.

६) किडनी स्टोन वर हि ओव्याची पाने ही प्रभावी ठरतात. ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी ओव्याची पाने विनेगर आणि मध यांचे मिश्रण सलग दहा दिवस घ्यावे यामुळे किडनी स्टोन च्या त्रासापासून सुटका मिळते.

७) जंक फूड खाणे व रोजच्या अनियमित सवयीमुळे गॅस अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.ओव्याच्या पानांचे सेवन केले असता गॅस अपचन आणि बद्धकोष्टता या समस्यांपासून सुटका मिळते.यासाठी ओव्याच्या पानांचा वापर करून बनवलेला काढा नियमितपणे प्यावा यामुळे पचनक्रिया सुधारते.

८) ओव्याच्या पानांमुळे एसिडिटी पासून सुटका मिळते.ऍसिडिटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दररोज सकाळी उठल्यावर किंवा प्रत्येक वेळी जेवण झाल्यानंतर गरम पाण्यासोबत ओव्याचे सेवन करावे.यामुळे एसिडिटीचा त्रास दूर होतो.ओव्याच्या पानांचे पचनासाठी खूपच चांगले फायदे आहेत.म्हणूनच आपल्या आहारात भाजी सूप इत्यादींमध्ये ओव्याचा थोड्याफार प्रमाणात तरी वापर करावा.

९) ओव्याच्या पानांनी डोळ्यांची प्रतिकार क्षमताही वाढते यासाठी ओव्याच्या पानांची चटणी करावी व ती साठवून ठेवावी. दररोज जेवणामध्ये या चटणीचा वापर केला असता आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता नक्कीच सुधारते.

१०) ओव्याच्या पानांचे सेवन हे वेगवेगळ्या प्रकारांनी केले जाऊ शकते.काही ठिकाणी ओव्याच्या पानांना तेलामध्ये कडक तळून घेतले जाते व दुपारच्यावेळी नाश्त्यामध्ये ही पाने खाल्ली जातात.ओव्यांमध्ये हळद,काळीमिरी इत्यादी मिसळून पाण्यामध्ये या मिश्रणाला उकडून घेऊन हा काढा चहा च्या ऐवजी पिला तरीही चालते.ओव्याच्या पानांचा रस काढून हा रस भाज्यांमध्ये मिसळला असता भाज्यांची चवही वाढते व त्याचे पोषणमूल्य वाढते.