Home » गवार ची भाजी खाण्याचे फायदे…
Uncategorized

गवार ची भाजी खाण्याचे फायदे…

गवार ची सर्वप्रथम लागवड भारतातील आंध्रप्रदेश मध्ये करण्यात आली आणि नंतर जगभरात या भाजीचा विकास झाला.लहान असो की मोठा प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.गवारची भाजी सगळ्यानांच आवडते असे नाही.भाजीचा आणि लहान मुलांचा छत्तीसचा आकडा असतो.तुम्हीपण लहान असताना ही भाजी नको,ती भाजी नको,मी ही भाजी नाही खाणार,मला नाही आवडत असे हट्ट आईकडे करत असताल.घरात नावडती भाजी बनवली की घरातील काही सदस्यांची तोंड वाकडी होतात.अशाच नावडत्या भाज्यामध्ये समावेश असणारी भाजी म्हणजे गवार खर तर काही जणांना गवार ची भाजी आवडते.

गवार च्या भाजीत अनेक पौष्टीक तत्वे आहेत.गवार ची भाजी आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.गवार ही एक औषधी वनस्पती आहे.या भाजी मध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.गवारीमध्ये फॅट नसल्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.अनेक प्रकारच्या आजारांसाठी ही भाजी फायदेशीर ठरते.त्यामुळे आजांपासुन दुर राहण्यासाठी गवारीच्या भाजीचा उपयोग होतो.

गवारच्या भाजीचे अनेक फायदे आहेत.तर आपण आज ते बघणार आहोत.चला तर मग जाणून घेवुया गवारीची भाजी  खाण्याचे फायदे.

१) लठ्ठपणा : ज्यांचे वजन वाढु लागले,लठ्ठपणा आहे त्यांना जर वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्यांनी गवारीच्या भाजीचे सेवन करावे.कारण गवारीची  भाजी खाल्याने पोट भरल्याची जाणीव होते त्यामुळे आपण कमी जेवन करतो त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

२) डायबिटीज : ज्या लोकांना डायबिटीज सारखे आजार आहे त्यांच्यासाठी ही भाजी खुप फायदेशीर ठरते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम ही भाजी करते.त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी गवार च्या भाजीचे सेवन केले पाहिजे.

३) ऍसिडिटी आणि कफ : गवारीच्या भाजीत फायबरचे प्रमाण जास्त आहे.ज्या पदार्थात फायबर असतात तो पदार्थ  कफ,ऍसिडिटी या सारख्या आजारांवर खुप फायदेमंद असतो.पचनाच्या समस्या,पोट साफ न होणे,ऍसिडिटी चा ञास,पित्त वाढत असेल तर गवारीच्या भाजीचे आठवड्यातून एक दोन वेळा तरी सेवन करावे.

४) हाडांची मजबुती : गवारीच्या भाजी मध्ये कॅल्शियम,लोह आणि पोटॅशियम असल्यामुळे ही भाजी हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे.तुम्ही अशक्त असाल किंवा हाडांच्या निगडीत काही समस्या असतील तर गवारीच्या भाजीचे सेवन करा हाडांमध्ये मजबुती निर्माण होते.

५) ह्रदय रोग : आजकाल हार्ट अटॅक चे प्रमाण वाढले आहे तसेच रक्तदाब चे रुग्ण घराघरात दिसुन येतात या भाजी मध्ये पोटॅशियम,लोह,फायबर जास्त प्रमाणात आढळते आणि हे तिन्ही घटक आपल्या ह्रदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.या बरोबरच कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास ही भाजी मदत करते.

आपल्याला जर भविष्यात हार्ट अटॅक येऊ नये असे वाटत असेल आणि रक्तदाब वाढू नये असे वाटत असेल तर गवारीची भाजी अवश्य खा.