Home » राजगि-याच्या सेवनामुळे शरीराला मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!
Uncategorized

राजगि-याच्या सेवनामुळे शरीराला मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!

भारतीय संस्कृतीमध्ये उपास व व्रते वैकल्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपवास करताना काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केले जाते. यामध्ये राजगिरा या पदार्थ पासून बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ उपासाला खाऊ शकले जाणारे पदार्थ बनवले जातात. राजगिरा हा केवळ उपवासाचा पदार्थ म्हणूनच नव्हे तर पौष्टिक पदार्थ म्हणूनही सेवन केला जातो व यांचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. यांपैकी काही महत्त्वाचे फायदे आपण पाहूया.

  1. राजगि-यामध्ये लायसिन हे एक महत्त्वाचे अमिनो ऍसिड असते.लायसिनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. लायसिनमध्ये दुधापेक्षाही जास्त प्रथिने असतात. प्रथिनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी असलेला राजगिरा हा घटक पदार्थ खूपच उपयुक्त ठरतो.
  2. राजगि-यामध्ये कॅल्शियम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते आणि अन्य पदार्थांपेक्षा राजगि-यामध्ये कॅल्शियम चार पटींनी जास्त असते.
  3. राजगिरा हा घटक पदार्थ क जीवनसत्त्वाचा उत्तम स्त्रोत आहे.
  4. राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम ,फॉस्फरस, व झिंक खूप मोठ्या प्रमाणात असतात.
  5. राजगिरामध्ये असलेल्या क जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.सर्दी खोकला व तत्सम संसर्गजन्य आजारांपासूनही संरक्षण मिळते.
  6. राजगिरा मध्ये मोठ्या प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल घटल्याचे कार्य राजगिऱ्याच्या सेवनामुळे घडते परिणामी हृदयाचे आरोग्य सुरळीत राहते.
  7. राजगिरा घटक पदार्थांमध्ये विरघळू शकणा-या तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असते. यामुळे बद्धकोष्ठता,गॅसेस, अपचन,पोट दुखणे या  समस्यांपासून आराम मिळतो
  8. राजगिरामध्ये असलेल्या कॅल्शियम ,मॅग्नेशियम ,फॉस्फरस या घटकांमुळे हाडांचे आरोग्य चांगले राखले जाते.
  9. राजगिरा हा पदार्थ ग्लुटेनफ्री असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.सध्या वजन कमी करण्यासाठी बाजारात अनेक महागडी उत्पादने उपलब्ध आहेत मात्र राजगिरा हा त्या मनाने कमी किंमतीतील प्रभावी उपाय आहे.