Home » दररोज दह्याचे सेवन करण्याचे फायदे…
Uncategorized

दररोज दह्याचे सेवन करण्याचे फायदे…

दररोज दह्याचे सेवन करणे शरीरासाठी खूप  फायदेशीर आहे दह्याला सुपरफूड देखील म्हटले जाते.मात्र आपण दह्याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल तर त्याचा अधिक फायदा होतो.दुधाच्या तुलनेत दही लवकर पचन होते.ज्या व्यक्तींना पोटासंबंधी काही समस्या असतील जसे अपचन,बद्धकोष्ठता,गॅस यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. दह्यामध्ये पचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात तसेच उच्च प्रतीचे प्रोटीन हि असते.तर आज आपण दररोज दह्याचे सेवन करण्याचे फायदे बघणार आहोत…

दररोज दह्याचे सेवन करण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे…  

१) वजन कमी करण्यास फायदेशीर : वजन कमी करण्यासाठी दही फायदेशीर आहे.दह्यामध्ये लो फॅट असल्यामुळे यामध्ये उच्च प्रथिने देखील असतात ज्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते.म्हणून अनेकदा दही खाण्याचा सल्ला दिला जातो.रायता किंवा लस्सी याद्वारे देखील दह्याचे सेवन करु शकत.

२) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते : दही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.कारण दह्यामध्ये प्रोबायोटिक्स पोषक तत्वे असतात जे शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरतात.ज्या लोकांना दूध प्यायला आवडत नाही ते लोक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करु शकतात.

३) प्रतिकारक शक्ती वाढविण्यात सहायक आहे .यामध्ये चांगले बॅक्टेरिया आढळतात जे शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते या पेशी संसर्गापासून शरीराला सुरक्षित ठेवतात.दही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते त्यामुळे  दह्याचे सेवन केल्याने विषाणू नष्ट होतात संसर्गजन्य आजार होत नाहीत व दातातील कीड नाहीशी होते. 

४) पचनक्रिया चांगली राहते : दररोज दह्याचे सेवन केल्यास आपली पचन क्रिया चांगली राहते.म्हणून दररोज एक वाटी दही खाणे फायदेशीर मानले जाते.याशिवाय दह्यामुळे पोट साफ राहते त्यामुळे दिवसभर पचनक्रिया निरोगी ठेवते.म्हणून सकाळी किंवा दुपारी दही खाण्याचा सल्ला दिला जातो.पचन मध्ये सुधारणा करतो.दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक पचन तंत्राला सुधारते त्यामुळे पोट हलके राहते.या कारणामुळे जेवतांना लोक दह्याचे सेवन करतात.

दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. पचन होण्यासाठी दही अतिशय उपयोगी आहे.अन्न व्यवस्थित होत नसेल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात.दही रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर करते.पोटात होणाऱ्या इन्फेक्शनपासून सुटका मिळते.तसेच ज्यांना कमी भूक लागते त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरते. 

५) गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होते : गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या ही आज एक सामान्य गोष्ट झाली आहे. परंतु ह्या समस्या दूर करण्यासाठी दही खूप उपयुक्त मानले जाते.कारण दह्यामध्ये असे घटक आहेत जे गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करतात.म्हणून आहारात नियमित दह्याचे सेवन करणे चांगले मानले जाते.

६) रक्तदाब नियंत्रित करते : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे उपयुक्त ठरते.दह्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते जे रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त मानले जाते.ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो ते दही खाऊ शकतात.

७) आरोग्य निरोगी राहते : उन्हाळ्याच्या दिवसात दही खाणे पुरुषांसाठी फायदेशीर मानले जाते.एका संशोधनानुसार दही पुरुषांमध्ये वीर्य गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.याशिवाय दह्यामुळे पुरुषांचे आरोग्य बळकट होते.दही आपल्याला बर्‍याच रोगांपासून दूर ठेवते.म्हणून पुरुषांना दह्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

८) ताणतणाव कमी होतो : धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे अनेकदा ताणतणाव निर्माण होतात.दहीचे सेवन केल्यामुळे ताणतणाव कमी होतो.ताण कमी करण्यासाठी दही उपयुक्त आहे.कारण दही खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.ज्यामुळे थकवा आणि तणाव जाणवत नाही म्हणून जे लोक जास्त काम करतात त्यांनी दह्याचे सेवन केले पाहिजे.  

९) उष्णता दुर होते : गरमीच्या दिवसात दह्याचे सेवन करायला पाहिजे उष्णता दुर होते.शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नियमित दह्याचे सेवन केले पाहिजे.दह्याचे सेवन केल्यास पोटातील उष्णता कमी होते.त्यामुळे तोंडातील फोड आणि घामोळ्यांच्या समस्या कमी होतात.तसेच पोटात जळजळ होत असल्यास आणि पित्त असल्यास दररोज एक वाटी दही खाणे उत्तम आहे. 

१०) दही खाल्ल्याने शरीराला लोह,मॅग्नेशियम आणि झिंक या घटकांची पूर्ती होते.यामुळे आपल्या त्वचेवरील मृत पेशी जिवंत होतात.सोबत शरीरातील रक्तप्रवाहाचे कार्य देखील सुरळीत राहते.यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर, तजेलदार आणि उजळ दिसते.आहारात दह्याचे सेवन करण्याबरोबर आपण दही चेह-यावर देखील लाऊ शकतो. वेगवेगळे महागडे प्रोडक्ट्स चेहऱ्यावर लावण्यापेक्षा नैसर्गिक घटकांपासून बनलेले दही कधीही सर्वोत्तम ठरते.