Home » तुम्ही विचारही केला नसेल असे अंजीर खाण्याचे काही चमत्कारी फायदे…
Uncategorized

तुम्ही विचारही केला नसेल असे अंजीर खाण्याचे काही चमत्कारी फायदे…

ड्रायफ्रूट म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर बदाम,काजू आणि मनुके लक्षात येतात.परंतु यासारखेच आरोग्यासाठी फायदेशीर असणारे फळ म्हणजे अंजीर.अंजीर वाळून याचा देखील आपण ड्रायफ्रूट मध्ये समावेश करू शकतो.अंजीर हे कमी पाण्यावर येणारे फळझाड आहे.अंजिराची लागवड करण्यासाठी उष्ण आणि कोरडे हवामान चांगले असते.अंजिराची लागवड फक्त महाराष्ट्रामध्येच केली जाते विशेषता सातारा आणि पुणे परिसरातील पुरंदर आणि सासवड तालुक्यात येथे अंजिराचे उत्पादन घेतले जाते. आपण अंजीर ची लागवड दुष्काळी भागातही करू शकतो.

अंजीर मध्ये लोह,चुना तसेच अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं.अंजीर हे त्वचेच्या संबंधीत असणाऱ्या सर्व आजारांवर अत्यंत फायदेशीर आहे.अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात.तर सुक्या अंजिरमध्ये क्षार आणि जीवनसत्व असतात.ड्रायफ्रूट च्या सेवनाने आरोग्याविषयी असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात.

शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी,लठ्ठपणा कमी करण्यासाठी,डायबिटीस,रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच आरोग्याविषयी असणाऱ्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अंजीर मदत करते.तसेच महिलांच्या आरोग्यासाठी देखील अंजीर गुणकारी ठरते.अंजीर भिजवून खाल्ले तर आरोग्यासाठी आणखी फायदे आहेत.

चला तर मग जाणून घेऊया अंजिरचे आरोग्यदायी असणारे फायदे…   

१) पित्त,वात आणि रक्तासंबंधी समस्या : अंजीर हे पित्त,वात आणि रक्त या संबंधीत असणारे विकार दूर करते.अंजीरचे सेवन केल्याने पित्त,वात,कफ आणि रक्त या संबंधीत असणारे सर्व आजार दूर होतात.ताज्या अंजीर मध्ये पोषक घटकाचे प्रमाण जास्त असते आणि सुक्या अंजीरमध्ये क्षार आणि जीवनसत्वे जास्त प्रमाणात असतात. 

२) अशक्तपणा : अंजीरमध्ये लोह अधिक प्रमाणात असते.त्यामुळे अंजिराचे सेवन केल्यास भूक लागते.अंजीर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.अनेमिया झाल्यावर अंजिराचे सेवन करावे.अशक्तपणा जाणवत असेल तर अंजिराचे सेवन करावे अशक्तपणा कमी होईल आणि शक्ती प्राप्त होईल. 

३) मूळव्याध : मूळव्याध यासारख्या आजारावर अंजीर अत्यंत फायदेशीर आहे.अंजीर रात्री पाण्यामध्ये भिजू घालून सकाळी खावे तोंड येणे,ओठ उलने या सारख्या समस्या असल्यास अंजीर खाल्ल्याने मदत होईल.तोंड आल्यावर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यावर कमी होईल. 

४) उष्णता कमी करण्यासाठी : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धी साठी अंजीर आणि गूळ मिक्स करून खाल्ले तर रक्त शुद्ध होईल आणि उष्णता देखील कमी होईल आणि शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढेल. 

५) हाडे मजबूत होण्यासाठी : अंजीरमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तसेच हृदया संबंधीत असणाऱ्या आजारांवर हि अंजीर अत्यंत फायदेशीर आहे.

६) पोट साफ होण्यासाठी : अंजीरमध्ये फायबर असल्यामुळे पोट साफ होते आणि पचनक्रिया सुधारते.अंजीर मध्ये असणारे पोटॅशिअम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

७) क्षयरोग : क्षयरोगासाठी ताजे अंजीर खाणे अत्यंत उपयुक्त आहे आणि तसेच ताप आला तर अंजिराचे सेवन करा तापाचे प्रमाण कमी होईल.अंजिराच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळेच क्षयरोगासारखे आजार बरे होतात. 

८) रक्तदाब : अंजिराचे सेवन केल्य्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी देखील अंजीर अतिशय प्रभावी आहे.दम्यावरही अंजीर एक गुणकारी औषध आहे.अंजीर आणि गोरख चिंच समप्रमाणात घेऊन सकाळी खाल्ल्यास श्वसन क्रिया सुधारते आणि दम्याचा त्रास कमी होतो. 

९) डोळ्यांसाठी : वयानुसार डोळ्याची दृष्टी कमी होते.अंजीर मध्ये व्हिटॅमिन-ए असल्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत करते.अंजिराचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

१०) लैंगिक समस्या : लैंगिक आजारांवर अंजीर फायदेशीर आहे तसेच लैंगिक सामर्थ्य वाढवण्यासाठी २-३ अंजीर दुधात भिजून खावेत.गरोदर महिलांनी अंजीर खाल्ल्याने लोहाची कमतरता जाणवत नाही.