Home » हनुमानफळ खाण्याचे फायदे…
Uncategorized

हनुमानफळ खाण्याचे फायदे…

भारतीय आयुर्वेदामध्ये अशी अनेक फळ आहे ज्याचा वापर करून देखील आपण वेगवेगळ्या आजारांवर मात करू शकतो.काही परदेशातुन आलेले फळांचा देखील यामध्ये सहभाग असतो.परदेशी फळे खाऊन देखील आपण तंदुरुस्त राहू शकतो.यामधील एक फळ ज्याचे नाव आहे हनुमान फळ आहे.त्याला लक्ष्मण फळ असे देखील म्हणतात.हे फळ साधारणत मॅक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मिळते.हनुमान फळ हे रामफळ व सीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे.

हनुमान फळालाच एनोमा मुरिटका असेही म्हणतात.या फळांमध्ये भरपुर प्रमाणात विटॅमिन,मिनरल्स असतात.या फळाची चव आंबट-गोड असते.हनुमान फळाची चव स्ट्रॉबेरी आणि सीताफळ सारखी लागते.हे फळ खाऊन आपण विविध आजारावर मात करू शकतो.

चला तर मग जाणून घेऊया हनुमान फळ खाण्याचे फायदे…

१) अल्सरपासुन सुटका : आजकाल बाहेरचे अन्न खाऊन किंवा इतर आजारांमुळे मोठ्या प्रमाणात अनेकांना अल्सर सारखा आजार होत आहे.अल्सर झाल्याने आपल्याला पोट दुखीचा त्रास होतो.तसेच गॅस्ट्रिक अल्सर देखील त्रासदायक असतो.हनुमान फळ खाल्ल्याने यावर आपण ही समस्या दुर करु शकतो.हनुमान फळ नियमित खाल्ल्याने अल्सर सारख्या आजारापासुन सुटका मिळते.

२) ) गुडघा दुखी पासुन सुटका : वाढते वय आणि इतर कारणामुळे अनेकांना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आहे.काही जणांना तर तरुण वयात पण गुडघेदुखी सारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.बाहेरील अन्न खाणे आणि इतर व्यसनामुळे हा आजार मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे आपण हनुमान फळाचे सेवन करुन गुडघेदुखीचा त्रास कमी करू शकता.

३) कॅन्सरवर मात : कॅन्सर सारखा आजार आता सामान्य झाला आहे अनेकांना या आजाराने घेरले आहे.कित्येक जणांना केमोथेरपी करावी लागत आहे.यानंतर रुग्ण या आजारातून बाहेर पडू शकतात.मात्र हा धोका टाळण्यासाठी आपण हनुमान फळ खाऊन हा आजार दुर करू शकतो.यासाठी नियमितपणे प्रयोग करावा लागेल.सीता फळासारखे लागणारे हे फळ अतिशय आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरलेले आहे.

४) रोगप्रतिकार शक्ती : अनेकांना रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेची समस्या जाणवत आहे.याचे कारण देखील तसेच आहे.तरुणवर्ग केवळ फास्टफूड आणि बाहेरच्या खाण्यावर भर देत असतो.सर्व फळ आआणि पौष्टिक आहार घेत नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असल्याचे आढळून येते अशावेळी हनुमान फळ खाऊन यावर मात करू शकतो.यासाठी दररोज नियमितपणे हनुमान फळ खावे.

५) मधुमेह यावर उपाय : हनुमान फळामध्ये अँटीडायबेटिक आणि हायपोलीपिडेमिक क्रिया आहेत.एका संशोधनानुसार दोन आठवडे दररोज हनुमान फळ खाल्ल्याने रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.तसेच अँटीऑक्सिडेंट प्रभाव स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना ऑक्सिडेटिव्ह पासुन वाचवते जे मधुमेहाचे मुख्य कारण आहे.

६) मलेरियावर उपाय : हनुमान फळाच्या पानांमध्ये असलेले अँटीप्लाज्मोडियल एजेंट रोगास कारणीभूत असलेल्या परजीवीवर प्रभावी आहे.एका संशोघनानुसार हनुमान फळाच्या पानांचा अर्क मनुष्यामध्ये मलेरिया पसरविणार्‍या प्रोटोझोआन परजीवीच्या दोन प्रकारच्या प्लाझमोडियम फाल्सीपेरम विरूद्ध प्रतिरोधक दर्शवितो.