Home » जांभळाचे सेवन केल्याने होतील हे जबरदस्त फायदे…
Uncategorized

जांभळाचे सेवन केल्याने होतील हे जबरदस्त फायदे…

जांभळाचे आयुर्वेदामध्ये खुप महत्त्व आहे.जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो.जांभूळ हे फळ मधुमेह,मुतखडा,अतिसार,पोटात मुडा येणे,यकृत रोग आणि रक्तजन्य विकारांपासून बचाव करण्यासाठी अतिशय लाभदायक आहे.मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बियांची पावडर सर्वोत्तम उपाय आहे. 

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे.परंतु जांभळाच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंड असतात जे मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास देखील जांभळाच्या बियांचा उपयोग होतो.

चला तर मग जांभळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…

१) मधुमेहावर नियंत्रण : जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात.त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून टाळते आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात राहते.जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर दिवसातून तीनदा खावी मधुमेहावर हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे.दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या.त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे.त्यामुळे मधुमेहाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.

२) रक्तदाबाचा त्रास कमी होतो : मधुमेहाबरोबर रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास देखील जांभूळ फायदेशीर आहे.एका संशोधनानुसार जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब 34.6% नी कमी होतो.त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्समध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात.

३) पोटांच्या विकारांवर उपयुक्त : पचनसंस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठीही जांभूळ उपयुक्त ठरते.बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर आणि गॅस्ट्रो इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे.जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून 2-3 वेळा घ्यावी.

४) मुरुमांवर लाभदायी : जांभळाची बी पाण्यात उगाळून तो लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर आलेला मुरूम बरा होण्यास मदत होते.मुलतानी माती,चंदन पावडर व जांभूळ पावडर यांचे एकत्रित मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावर नियमितपणे लावल्याने मुरम नाहीसे होतात व चेहरा उजळतो,काळपटपणा दूर होतो.जांभळाचे ज्यूस त्वचाविकारात त्वचेला लावल्याने फायदेशीर ठरते. 

५) हिमोग्लोबीन वाढण्यास मदत : जांभळाचे सेवन केल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा,अ‍ॅनेमिया यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमितपणे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते.

६) दातांच्या समस्या दूर होतील : दात कमजोर असतील हिरड्या मधुन रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीचा रस घ्यावा.जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.जखम झाल्यावर रक्त थांबवण्यासाठी जखमेवर जांभळाची पाने लावावी रक्त थांबते.

७) यकृत आणि संधिवातच्या समस्या दूर करते : यकृताच्या समस्या असतील तर जांभळाची पाने खावीत.नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी जांभळाच्या पानांचा रस घेतल्याने यकृत निरोगी राहते.तसेच सांधिवात असेल तर जांभळाच्या झाडाची साल उकळून त्याचा लेप लावावा वेदना कमी होतील.